‘लिव्ह इन’मध्येही हुंडाबळीचा गुन्हा, प्रयागराज उच्च न्यायालयाचा निकाल

‘लिव्ह इन’मध्येही हुंडाबळीचा गुन्हा, प्रयागराज उच्च न्यायालयाचा निकाल

प्रयागराज उच्च न्यायालयाने आदर्श यादवची याचिका फेटाळताना नमुद की, मृत व्यक्ती ही कायदेशीररीत्या त्या व्यक्तीची विवाहित पत्नी नव्हती, परंतु, कोर्टात सादर केलेल्या पुराव्यावरून असे दिसून येते की दोघेही रिलेशनशीपमध्ये पती-पत्नीसारखे एकत्र राहत होते, त्यामुळे या प्रकरणात हुंडा मृत्यूच्या तरतुदी लागू होतात.

लिव्ह इन रिलेशनशिप राहणाऱया जोडप्याबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला.  पती-पत्नीसारखे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्यांना  हुंडाबळी प्रकरणात आरोपी   बनवले जाऊ शकते, असे उच्च न्यायालयाने म्हटले.  पती-पत्नीसारखे  राहणे हा हुंडाबळीसाठी पुरेसा आधार असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले.

प्रयागराज येथील उच्च न्यायालयात आदर्श यादव यांची याचिका फेटाळताना उच्च न्यायालयाने हे नमूद केले.  आदर्श यादवच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. आदर्श यादव याच्यावर हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोप असून  प्रयागराज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

यादवने लिव्ह इन प्रेयसीवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप आहे. प्रियकराच्या या छळाला कंटाळून प्रेयसीने आत्महत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते. आरोपीने निर्दोष मुक्तीसाठी याचिका दाखल केली होती, ती सत्र न्यायालयाने  फेटाळली होती. त्यानंतर त्याने उच्च कोर्टात धाव घेतली. ‘मी तिचा पती नाही, त्यामुळे माझ्यावर हुंड्यासाठी छळाचा गुन्हा दाखल करता येणार नाही,’ असे याचिकाकर्त्याच्या वतीने सांगण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;