बेकायदा होर्डिंग्जवर हायकोर्टाचा हातोडा; विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याचे आदेश

बेकायदा होर्डिंग्जवर हायकोर्टाचा हातोडा; विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याचे आदेश

<<<मंगेश मोरे>>>

बेकायदा होर्डिग्जच्या प्रश्नाची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जागोजागी मोठ्या प्रमाणावर बेकायदा होर्डिंग्ज उभारले जात असल्याचे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. त्यावर न्यायालयाने संपूर्ण राज्यभरातील बेकायदा होर्डिग्जविरुद्ध आठ-दहा दिवसांची विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याचे आदेश सर्व महापालिका, नगरपरिषद आणि ग्रामपंचायतीना दिले आहेत. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तीन दिवसांत तातडीने बैठक घेऊन त्यात सर्व यंत्रणांच्या प्रमुखांनी एकत्र येऊन कारवाईची पावले उचलावीत, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

बेकायदा होर्डिंग्जमुळे शहरे विद्रूप होत आहेत. याला आळा घालण्यासाठी निर्देश द्या, अशी मागणी करीत सुस्वराज्य फाऊंडेशन व इतरांनी अ‍ॅड. उदय वारुंजीकर, अ‍ॅड. मनोज कोंडेकर, अ‍ॅड. मनोज शिरसाट यांच्यामार्फत जनहित याचिका तसेच अवमान याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवर आज मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठापुढे एकत्रित सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांनी पालिका व इतर यंत्रणांच्या अपयशाकडे लक्ष वेधले आणि कारवाईची विशेष मोहीम राबविण्यासाठी निर्देश देण्याची विनंती केली. ही विनंती खंडपीठाने मान्य केली.

याचवेळी खंडपीठाने बेकायदा होर्डिंग्जच्या प्रश्नाची व्याप्ती विचारात घेऊन मूळ जनहित याचिकेवर नव्याने सुनावणी घेण्यास तयारी दर्शविली. तसेच अवमान याचिका निकाली न काढता त्यावरही सुनावणी सुरू ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे पालिका व सरकारवर अवमान कारवाईची टांगती तलवार कायम राहणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;