अखेर करीना कपूर हिने केला ‘तो’ अत्यंत मोठा खुलासा, म्हणाली, सैफ अली खान याने…

अखेर करीना कपूर हिने केला ‘तो’ अत्यंत मोठा खुलासा, म्हणाली, सैफ अली खान याने…

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान ही कायमच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी करीना कपूर हिचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात करीना आणि आमिर खान हे मुख्य भूमिकेत दिसले. मात्र, या चित्रपटाला अजिबातच धमाका करण्यात यश मिळाले नाही. परिणामी हा चित्रपट फ्लॉप गेला. लाल सिंह चड्ढा चित्रपट फ्लॉप गेल्यानंतर आमिर खानला इतका मोठा धक्का बसला की, तो काही दिवस मोठ्या पडद्यापासून गायब झाला. हेच नाही तर आमिर खान याच्याकडून खुलासा करण्यात आला की, सतत चित्रपटांच्या शूटिंगमुळे कुटुंबाला अजिबातच वेळ देऊ शकलो नसल्याने पुढील काही दिवस फक्त कुटुंबाला वेळ देईल.

नुकताच आता करीना कपूर खान हिने अत्यंत मोठा खुलासा केलाय. करीना कपूर ही कपिल शर्मा याच्या शोमध्ये बहीण करिश्मा कपूर हिच्यासोबत पोहोचली. यावेळी तिने सैफ अली खान याच्याबद्दल खुलासा केला. कपिल शर्मा याने करीना कपूर हिला सैफ अली खान याच्या हातावर असलेल्या टॅटूबद्दल विचारले. त्याबद्दलच तिने खुलासा केला.

करीना कपूर म्हणाली की, ज्यावेळी सैफ अली खान याने मला प्रपोज केला त्यावेळी मी त्याला म्हटले की, इतके प्रेम आहे तर तुझ्या हातावर आपल्या दोघांचा टॅटू काढ. त्यानंतर सैफने ती गोष्ट ऐकली आणि त्याच्या डाव्या हातावर सैफीना नावाचा टॅटू काढला. पहिल्यांदाच करीना कपूर ही त्या टॅटूबद्दल खुलासा करताना दिसलीये.

2008 पासून करीना कपूर आणि सैफ अली खान रिलेशनमध्ये आले. 2012 मध्ये त्यांनी लग्न केले. विशेष म्हणजे सैफ अली खान यानेच लग्नासाठी करीना कपूर खान हिला प्रपोज केला. सैफ अली खान याचे करीना कपूर हिच्यासोबतचे हे दुसरे लग्न तर करीना कपूर हिचे हे पहिलेच लग्न होते. करीना कपूर आणि सैफ अली खान यांची तैमूर आणि जेह नावाचे दोन मुले आहेत.

विशेष म्हणजे करीना कपूर खान ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना करीना कपूर दिसते. करीनाची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग सोशल मीडियावर बघायला मिळते. करीना कपूर हिने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर कुटुंबासोबतचे विदेशातील फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;