‘भुलभुलैय्या 3’मध्ये एक नव्हे तर दोन मोंजोलिका; माधुरी दीक्षित-विद्या बालन आमनेसामने

‘भुलभुलैय्या 3’मध्ये एक नव्हे तर दोन मोंजोलिका; माधुरी दीक्षित-विद्या बालन आमनेसामने

‘भुलभुलैय्या 3’ या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या टीझरला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांसाठी सर्वांत मोठं सरप्राइज पहायला मिळतंय. यामध्ये कार्तिक आर्यन रुह बाबाच्या आणि विद्या बालन मोंजोलिकाच्या भूमिकेत आहेत, हे टीझरमध्येच स्पष्ट झालं होतं. मात्र आता अभिनेत्री माधुरी दीक्षितसुद्धा यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असल्याचं ट्रेलर पाहून समजतंय.

जवळपास चार मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये पहायला मिळतंय की, रुह बाबाला (कार्तिक) एका शाही महालात बोलावलं जातं. यामध्ये अभिनेत्री तृप्ती डिमरी कार्तिकच्या प्रेयसीच्या भूमिकेत आहे. तर संजय मिश्रा आणि राजपाल यादव यांनी कॉमेडीचा तडका दिला आहे. विशेष म्हणजे या तिसऱ्या भागात एक नव्हे तर दोन-दोन मोंजोलिका आहेत. विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यांच्यात चांगलीच जुगलबंदी पहायला मिळणार आहे. या दोघींपैकी नेमकी मोंजोलिका कोण आहे, असा प्रश्न या ट्रेलरच्या अखेरीस पडतो. त्याचं उत्तर प्रेक्षकांना थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच मिळू शकेल. या चित्रपटात अभिनेता विजय राजनेही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

‘भुलभुलैय्या 3’चा ट्रेलर राजस्थानमधील जयपूरमध्ये लाँच करण्यात आला. जयपूरमधील राज मंदिर सिनेमा याठिकाणी हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. यावेळी कार्तिक आर्यन, तृप्ती डिमरी आणि विद्या बालन उपस्थित होते. अनीस बाझमी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर 1 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भुलभुलैय्या’ या पहिल्या भागात विद्याने मोंजोलिकाची जबरदस्त भूमिका साकारली होती. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी ती या हॉरर कॉमेडी चित्रपटातून पुनरागमन करतेय.

‘भुलभुलैय्या 3’ या हॉरर कॉमेडी चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’शी होणार आहे. यामध्ये अजय देवगण, करीना कपूर खान, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, अर्जुन कपूर, टायगर श्रॉफ, अक्षय कुमार अशी तगडी स्टारकास्ट आहे.

‘भुलभुलैय्या 3’ची कथा, पटकथा आणि संवाद आकाश कौशिकने लिहिले आहेत. हा तिसरा भाग कॉमेडीपेक्षा जास्त हॉरर असल्याचं ट्रेलरवरून समजतंय. 2022 मध्ये ‘भुलभुलैय्या 2’ बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. त्यावेळी हिंदी सिनेसृष्टीला कोरोना महामारीचा फटका बसला होता. अशा कठीण काळात कार्तिकच्या या चित्रपटाने प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणत 185 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;