विचार करून वेड लागले… अ‍ॅनिमलमधील भूमिकेवरून तृप्ती डिमरीने केला खुलासा

विचार करून वेड लागले… अ‍ॅनिमलमधील भूमिकेवरून तृप्ती डिमरीने केला खुलासा

संदीप रेड्डी वंगा यांची अ‍ॅक्शन फिल्म अ‍ॅनिमल प्रचंड गाजली. या चित्रपटावर अनेक चांगल्या वाईट प्रतिक्रिया उमटलेल्या पाहायला मिळाल्या. या चित्रपटातील अभिनेत्री तृप्ती डिमरी या चित्रपटामुळे बरीच चर्चेत आली. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. मात्र या चित्रपटातील तृप्तीच्या भूमिकेवर प्रेक्षक नाराज झाले होते. याबाबत आता तृप्तीने खुलासा केला आहे.

अ‍ॅनिमल चित्रपटानंतर तृप्ती प्रसिद्धीच्या झोतात आली. मात्र तिला टीकेला देखील सामोरे जावे लागले. या टीकांमुळे 2-3 दिवस ती सतत रडली. माझ्यावर अशा प्रकारची टीका केली जाईल, अशी मला कधीच अपेक्षा नव्हती. कमेंट्स वाचून चक्रवायला झाले होते, असे तृप्तीने एका मुलाखतीत सांगितले आहे.

तृप्ती नुकतीच रणवीर अलाहबादिया याच्या पॉडकास्टवर मुलाखतीसाठी गेली होती, यावेळी तिने याबाबत खुलासा केला. या घटनेनंतर तृप्तीच्या बहिणीने तू जे काही मिळवले आहेस, ते साध्य करण्याकरीता त्या पाठची मेहनत तुला माहीत आहे, त्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊ नको अशा शब्दात तिने तृप्तीला समजावले.

पुढे तृप्तीने, मी एक संवेदनशील व्यक्ती आहे. कुणाशी भांडण झाले तर त्यानंतर मी माझ्या कोशात जाते. या घटनेनंतर ही तसेच झाले. टीका पाहून माझ्या मनावर फार वाईट परिणाम झाला. त्यानंतर टीकांचे वाढते प्रमाण पाहून खूप वाईट वाटले. पण माझ्याकडे त्याचवेळी खूप काम होते. त्यामुळे टीकांवर प्रतिक्रीया देण्यासाठी माझ्याजवळ फार वेळ नव्हता, असे तिने सांगितले.

अभिनेत्रीने, यावेळी कधी कधी मन मोकळे करण्यासाठी काही वेळा रडणे चांगले असते. रडल्याने मनावरचा ताण कमी होतो, आणि हळूहळू त्या प्रंसगातून बाहेर पडण्यासही मदत होते, असे सांगितले.

बॅक टू बॅक हिट्सनंतर तृप्ती लवकरच राजकुमार रावसोबत कॉमेडी-ड्रामा “विकी विद्या का वो वाला व्हिडीओ” या चित्रपटात दिसणार आहे. येत्या 11 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;