लाडकी बहीण कार्यक्रमासाठी गर्दी जमवण्याचा अट्टाहास महिलांच्या जीवावर बेतला, एसटी बस 50 फूट खोल दरीत कोसळली

लाडकी बहीण कार्यक्रमासाठी गर्दी जमवण्याचा अट्टाहास महिलांच्या जीवावर बेतला, एसटी बस 50 फूट खोल दरीत कोसळली

लाडकी बहीण कार्यक्रमासाठी गर्दी जमवण्याचा अट्टाहास महिलांच्या जीवावर बेतला असून रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटून एसटी बस 50 फूल खोल दरीमध्ये कोसळली. सुदैवाने यात मोठी जीवितहानी झालेली नाही. मात्र 8 महिला जखमी झाल्या असून एकीची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण कार्यक्रमासाठी गर्दी जमवण्यासाठी माणगाव तालुक्यातील मांजरोणे येथील रानवडे खुर्द गावातील महिलांना नेण्यासाठी एसटी बस पाठवण्यात आली होती. या बसमधून जवळपास 29 ते 30 महिला माणगाव येथे निघाल्या होत्या. मांजरोने घाटामध्ये एका अवघड वळणावार चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस कठडा तोडून 50 फूट खोल दरीमध्ये कोसळली.

दरम्यान, या अपघातात 8 महिला जखमी झाल्या आहेत. त्यामधील एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. जखमी महिलांवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;