Bigg Boss 18: सदावर्ते यांना ‘या’ देशातून जीवेमारण्याची धमकी, चौकशीत धक्कादायक माहिती समोर

Bigg Boss 18: सदावर्ते यांना ‘या’ देशातून जीवेमारण्याची धमकी, चौकशीत धक्कादायक माहिती समोर

‘बिग बॉस 18’ चे सदस्य आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांनी बिग बॉसच्या घरात फार मोठा दावा केला आहे. जेव्हा बिग बॉस स्पर्धक म्हणून सदावर्ते यांच्या नावाची घोषणा झाली तेव्हा त्यांना कराची (पाकिस्तान) मधून धमकीचा फोन आला होता. ‘बिग बॉस’ मधील इतर सदस्यांना जेव्हा सदावर्ते फोनबद्दल सांगत होते. तेव्हा त्यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचं नाव देखील घेतलं. ज्यामुळे ‘बिग बॉस’ च्या घरातील प्रत्येक जण थक्क झाला…

गुणरत्न सदावर्ते म्हणाले, ‘कधी – कधी तुमच्या आयुष्यात अनेक दुःख येतात. कालचीच गोष्ट मी तुम्हाला सांगतो. जेव्हा बिग बॉससाठी या लोकांना लीक केलं नव्हतं की मी येत आहे. पण जेव्हा माझ्या नावाची घोषणा झाली मी बिग बॉसमध्ये पोहोचलो आहे. तेव्हा बरोबर 8.30 वाजता मला कराची येथून धमकीचा फोन आला. आता याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.’

सांगायचं झालं तर, सदावर्ते यांना दाऊद इब्राहिम याचं देखील नाव घेतलं. पण काही शब्द म्यूट करण्यात आले आहेत. ज्यामध्ये सदावर्ते यांनी दाऊदचं नाव घेतलं आहे. यावेळी सदावर्ते यांनी तुरुंगात असताना घडलेली घटना देखील सांगितली.

सदावर्ते म्हणाले, ‘मी तुरुंगात होतो. मला जामिन मंजूर झाला नव्हता. एका पोलीस अधिकारी मला घेवून जाण्यासाठी आला होता. त्या दिवशी माझा एन्काउंटर ठरलेला होता. तुरुंगात एक आरएसएसचा व्यक्ती होता. डॉक्टर होता तो… मी त्याला म्हणालो 2.30 माझी सुनावणी आहे. तुम्ही मला 4 वाजेपर्यंत काहीही करुन तुरुंगात थांबवून ठेवा.’

‘मी, कंगना रणौत आणि अर्नब गोस्वामी आम्ही खूप स्ट्रगल केलं आहे. आम्ही अनेक गोष्टींचा सामना केला आहे.’ असं देखील सदावर्ते म्हणाले. सांगायचं झालं तर, सदावर्ते बिग बॉसच्या घरात स्वतःबद्दल अनेक गोष्टी सांगताना दिसत आहे.

पोलिसांनी दिली माहिती

भोईवाडा पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नीने शनिवारी पोलिसांसोबत संपर्क साधत सदावर्ते यांनी जीवेमारण्याची धमकी मिळाल्याचा दावा केला. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी केली आहे. तपासात फोन करणाऱ्या व्यक्तीचं नाव राहिल असं आहे. आता याप्रकरणी कसून चौकशी व्हायला हवी अशा मागणी सर्वत स्तरातून होत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;