वीज शुल्क भरूनही सामाजिक कार्यकर्त्याला निष्कारण केली अटक, मिंधे सरकारला हायकोर्टाने ठोठावला 25 हजारांचा दंड

वीज शुल्क भरूनही सामाजिक कार्यकर्त्याला निष्कारण केली अटक, मिंधे सरकारला हायकोर्टाने ठोठावला 25 हजारांचा दंड

कथित वीज चोरीप्रकरणी वीज शुल्क भरल्यानंतरही सामाजिक कार्यकर्त्याला निष्कारण अटक केली. पोलिसांची ही कारवाई मनमानी आहे, असे मत नोंदवत उच्च न्यायालयाने मंगळवारी मिंधे सरकारला 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला. ही रक्कम भरपाई म्हणून याचिकाकर्त्याला देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. तसेच चेंबूरच्या आरसीएफ पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्तांना दिले.

याचिकाकर्त्या अ‍ॅलेक्सने वीज मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी केली. त्यामुळे 64 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप अदानी इलेक्ट्रिसिटीने केला होता. अ‍ॅलेक्सने संबंधित वीज शुल्क भरले होते. त्याची खातरजमा न करताच पोलिसांनी अटकेची कारवाई केली, असा युक्तिवाद अ‍ॅलेक्सतर्फे अ‍ॅड. नितीन सातपुते यांनी केला. त्याची दखल घेत न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे ओढले.

दंडाधिकाऱ्यांवर कडक ताशेरे

दंडाधिकाऱ्यांनी बघ्याच्या भूमिकेत राहू नये. आरोपींना सर्वप्रथम त्यांच्यापुढे हजर केले जाते. व्यक्तीची निष्कारण अटक रोखणे आणि कायद्याचे रक्षण करणे हे दंडाधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. अॅलेक्सची पोलीस कोठडीत रवानगी करताना संवैधानिक कर्तव्य बजावण्यात दंडाधिकारी सपशेल अपयशी ठरले, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने ताशेरे ओढले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;