अजित पवार गटाचा माजी आमदार अडचणीत, महिलेवरील अत्याचारप्रकरणी भानुदास मुरकुटेंना अटक
महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा सध्या देशभरात गाजत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून दररोज विनयभंगाच्या आणि बलात्काराच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी केलेला महिला सुरक्षेचा दावा फोल ठरला आहे. अशातच आता नगर जिल्ह्यातील अजित पवार गटाचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना महिलेवरील अत्याचाराच्या आरोपांवरून अटक करण्यात आली आहे.
राहुरी पोलिसांनी सोमवारी (7 ऑक्टोबर 2024) मध्यरात्री पीडित महिलेच्या फिर्यादीवरून भानुदास मुरकुटे यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुरी तालुक्यातील एका महिलेने सोमवारी भानुदास मुरकुटे यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली होती. मुरकुटे यांनी 2019 पासून मुंबई, दिल्ली त्याचबरोबर नगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी भानुदास मुरकुटे यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी मुरकुटे यांच्यावर आयपीसी कलम 376, 328, 418, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List