महायुतीने महाराष्ट्राच्या मंत्रालयाची सर्कस करून ठेवली, विजय वडेट्टीवार यांची टीका

महायुतीने महाराष्ट्राच्या मंत्रालयाची सर्कस करून ठेवली, विजय वडेट्टीवार यांची टीका

धनगर समाजातील तिघांनी आरक्षणा मंत्रालयातील जाळीवर उड्या मारल्याचे समोर आले आहे. गेल्या आठवड्याभरातील अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे. या वरून विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मिंधे सरकारला फटकारले आहे. या सरकारने महाराष्ट्राच्या मंत्रालयाची सर्कस करून ठेवली आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

”धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, यासाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि आमदार हिरामण खोसकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मंत्रालयातील संरक्षक जाळीवरच उड्या मारल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी धनगर समाजातील तीन व्यक्तींनी मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या मारल्या. या घटनेने खळबळ उडाली असून पोलिसांनी त्या तिघांना तेथून बाहेर काढले आहे.

वडेट्टीवार यांची सरकारवर टीका

”आदिवासी आरक्षणाच्या मुद्द्यांनंतर आता धनगर आरक्षणासाठी कार्यकर्त्यांनी मंत्रालयातील जाळ्यावर उड्या मारल्या आहेत. महायुती सरकारने महाराष्ट्रातील विविध समाजात किती अस्वस्थता निर्माण केली आहे याचे हे चित्र आहे. महायुतीने महाराष्ट्राच्या मंत्रालयाची सर्कस करून ठेवली आहे. एका मागून एक आंदोलन होत आहे. पण सरकार अजूनही निष्क्रिय आहे. दोन समाजात निवडणुकीच्या तोंडावर असे वाद लावणे योग्य नाही, या आंदोलनमध्ये जीवाला धोका देखील आहे. सरकारने तात्काळ ह्यात लक्ष घालून दोन्ही समाजातील असंतोष मिटवावा ही आमची मागणी आहे”, असे वडेट्टीवार यांनी ट्विट केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;