भाऊ कदम बनणार ‘सीरियल किलर’; लवकरच नव्या नाटकाचा शुभारंभ
अभिनेता भाऊ कदम आणि विनोद हे जणू समीकरणच आहे. आता कॉमेडीचा हाच शार्प शूटर 'सिरियल किलर' ठरला आहे. अद्वैत थिएटर्स आणि सिंधु संकल्प एन्टरटेनमेंट प्रा. लि. प्रस्तुत, राहूल भंडारे आणि प्रणय तेली निर्मित आणि केदार देसाई लिखित दिग्दर्शित ‘सिरियल किलर’ हे धमाल नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
येत्या शनिवारी 12 ऑक्टोबरला रंगभूमीवर हे नाटक दाखल होत आहे. यात भाऊ कदमची मध्यवर्ती भूमिका असून त्याच्या जोडीला अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी, श्रद्धा हांडे, तेजस पिंगुळकर हे काम करणार आहेत.
मालिका अभिनेत्री आणि रिपोर्टर यांच्यामध्ये घडलेल्या घटनेने संशयाचे सुरुंग पेरले जातात. या घटनेनंतर 'सिरियल किलर' म्हणून आलेला खरंच 'सिरियल किलर' असतो की नसतो, याचा धमाल खेळ रंगतो. फुल टू कॉमेडीच्या रॅपरमध्ये गुंडाळून आलेला 'सिरियल किलर' काय धमाल उडवतो हे पाहणं रंजक ठरणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List