अखेर तारीख ठरली…, अंकिता होणाऱ्या नवऱ्याबद्दल लवकरच करणार मोठा खुलासा

अखेर तारीख ठरली…, अंकिता होणाऱ्या नवऱ्याबद्दल लवकरच करणार मोठा खुलासा

Ankita Walawalkar: सोशल मीडिया स्टार म्हणून अंकिता वालावलकर हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. कोकण कन्या अंकिता हिला ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून भरभरुन प्रेम मिळत आहे. सोशल मीडियावर अंकिताचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशात ‘बिग बॉस मराठी 5’ मुळे देखील अंकिता हिच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. अंकिता हिच्या चाहत्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे तिच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता देखील चाहत्यांच्या मनात शिगेला पोहचली आहे.

सांगायचं झालं तर, ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करण्यापूर्वी अंकिता हिने लग्नबंधनात अडकणार असल्याची घोषणा केली होती. आता बिग बॉस संपल्यानंतर अंकिता हिला तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल चाहते विचारत आहे. अनेक चाहते तर अंकिता हिला सोशल मीडियावर मेसेज करून जोडीदाराबद्दल विचारत आहेत.

अंकिता हिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक स्क्रिनशॉट शेअर केला आहे. ज्यामध्ये एका चाहत्याने अंकिताला नवरा कोण असा प्रश्न विचारला आहे. ‘तुझा घो कोण आहे सांग ना… झालं आता बिग बॉस, मी खरंच जाणून घेण्यासाठी उत्साही आहे…’ यावर अभिनेत्रीने ’12 ऑक्टोबर’ असं उत्तर दिलं. म्हणजे अंकिता 12 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या नवऱ्याबद्दल मोठा खुलासा करेल अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंकिता हिचा होणारा नवरा संगीत दिग्दर्शक असल्याचं तिने बिग बॉसमध्ये सांगितलं होतं. एका मुलाखतीत देखील अंकिताना होणाऱ्या नवऱ्याबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. ‘कोकण हार्टेड बॉय कोण आहे हे तुम्हाला लवकरच समजेल.. मी कोकणात लग्न करणार असून मुंबईत रिसेप्शन ठेवणार आहे…’ असं देखील अंकिता म्हणाली होती. सध्या सर्वत्र अंकिता हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

अंकिता हिचा ‘बिग बॉस मराठी 5’ मधील प्रवास

अंकिता हिने बिग बॉसच्या माध्यमातून चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं. बिग बॉसच्या घरातील वाद, भांडणं, मैत्री, टास्क इत्यादी गोष्टीमुळे अंकिता चर्चेत आली आणि पाचव्या सीझनची चौथी रनर अप ठरली. तर विजेता सूरज चव्हाण ठरला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;