सचिन तेंडुलकरच्या ‘लाडली’ने उभारला ‘बिझनेस एम्पायर’, सारा तेंडुलकरने बनवली स्वत:ची ओळख
सारा तेंडुलकर हिचा फॅशन सेन्स नेहमी चर्चेत असतो. एखादा इव्हेंट असो की मित्रांची पार्टी साराच्या स्टाइल स्टेटमेंटकडे लोकांचे लक्ष वेधले जाते. सोशल मीडियावर ती नेहमी सक्रीय असते. तिचे इस्टाग्रामवर तिचे 6.6 मिलियन फॉलोअर्स आहेत.
12 ऑक्टोंबर 1997 रोजी जन्मलेली सारा सचिन तेंडुलकर आणि डॉक्टर अंजली तेंडुलकर यांची मुलगी आहे. वडिलांचा व्यवसाय आईचा वैद्यकीय व्यवसाय यापेक्षा वेगळी वाट साराने निवडली. आता ग्लॅमर वर्ल्डमध्ये तिने स्वत:च्या बळावर कोट्यवधीची संपत्ती जमवली.
साराने आईप्रमाणे वैद्यकीय विभागाचे शिक्षण घेतले. तिने बायोमेडिकल सायन्समध्ये पदवी घेतली. त्यानंतर क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थ न्यूट्रिशनमध्ये पदवीत्तर शिक्षण घेतले. ती AfN ची नोंदणीकृत असोसिएट न्यूट्रिशनिस्ट आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List