शोएब मलिकच्या तिसऱ्या पत्नीच्या एक्स पतीने केले दुसरे लग्न, आता सानिया मिर्झा…

शोएब मलिकच्या तिसऱ्या पत्नीच्या एक्स पतीने केले दुसरे लग्न, आता सानिया मिर्झा…

पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याने काही दिवसांपूर्वीच सानिया मिर्झा हिच्यासोबत घटस्फोट घेत थेट पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्न केले. शोएब मलिक याने आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्यानंतर जाहीर करण्यात आले की, अगोदर सानिया मिर्झा आणि शोएबचा घटस्फोट झाला आणि मगच त्याने सना हिच्यासोबत लग्न केले. हैराण करणारे म्हणजे शोएब मलिक याचे हे तिसरे लग्न आहे. सना जावेद हिचे देखील शोएब मलिकसोबतचे दुसरे लग्न आहे. शोएब मलिकसोबतच्या घटस्फोटानंतर अजूनही सानिया मिर्झा हिने लग्न केले नाहीये.

आता सना जावेद हिचा पहिला पती उमैर जसवाल याने दुसरे लग्न केले. सना जावेद आणि शोएबच्या लग्नानंतर नऊ महिन्यांनी उमैर याने दुसरे लग्न केले. सना जावेद आणि उमैर जसवाल यांचे दोघांचे मार्ग वेगवेगळे झाल्याचे दिसतंय. सना जावेद ही कायमच शोएब मलिक याच्यासोबतचे खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

उमैर जसवाल हा पाकिस्तानमधील अत्यंत फेमस गायक आहे. उमैर जसवाल याने आपल्या लग्नाचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. फोटोमधील उमैरची स्माईल बरेच काही सांगून जाते. मात्र, उमैर जसवाल याने फक्त एकच फोटो हा सोशल मीडियावर शेअर केल्याचे बघायला मिळतंय. उमैर जसवाल याच्या लग्नानंतर विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.

उमैर जसवाल याने त्याच्या पत्नीबद्दल काहीच माहिती दिली नाहीये किंवा तिचा साधा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला नाहीये. चाहते त्याला शुभेच्छा देताना दिसत आहेत. मात्र, दुसरीकडे लोक त्याला खडेबोल सुनावताना दिसत आहेत. सना जावेद हिने लग्न केल्यामुळेच याने देखील पुन्हा लग्न केल्याचे सांगितले जातंय. मात्र, लग्नाच्या विविध चर्चांवर उमैर जसवाल याने अजून काहीच भाष्य केले नाहीये.

शोएब मलिक याने सना जावेद हिच्यासोबत लग्न केल्यानंतर सानिया मिर्झा ही देखील दुसरे लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसली. मात्र, सानिया मिर्झा हिने दुसऱ्या लग्नाबद्दल भाष्य करणे टाळल्याचे बघायला मिळाले. शोएब मलिक याच्यासोबत घटस्फोटानंतर सानिया मिर्झा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे. अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;