नग्नावस्थेत आढळला अडल्ट स्टारचा मृतदेह; वयाच्या 36 व्या वर्षी निर्घृण हत्या

नग्नावस्थेत आढळला अडल्ट स्टारचा मृतदेह; वयाच्या 36 व्या वर्षी निर्घृण हत्या

पॉर्न इंडस्ट्रीमध्ये अनेक धक्कादायक घटना घडत असतात. गेल्या काही दिवसांपासून अनेक अडल्ट स्टारच्या निधनाच्या बातम्या समोर येत आहे. आता देखील एका प्रसिद्ध अडल्ट स्टारचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळला आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. पोलीस देखील याप्रकरणी चौकशी करत आहे. वयाच्या 36 व्या वर्षी अडल्ट स्टारची निर्घृण हत्या झाल्यामुळे पोलीस कसून चौकशी करत आहे. ज्या अडल्ट स्टारची हत्या करण्यात आली तिचं नाव सिंडी एलिझाबेथ हर्नांडेझ पेरेझ असं आहे.

मेक्सिकोच्या मॉन्टेरी शहरात 36 वर्षीय मॉडेल आणि अडल्ट स्टार सिंडी एलिझाबेथ हर्नांडेझ पेरेझच्या हत्येचा पोलीस तपास करत आहेत. तिच्या मृत्यूनंतर परिसरात खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिंडी शुक्रवारी तिच्या तीन वर्षांच्या मुलाला नर्सरी आणण्यासाठी पोहोचली नव्हती. त्यानंतर सिंडी हिचा शोध सुरु झाला.

सुरुवातीला सिंडी हिच्या नातेवाईकांनी तपास सुरु केला. त्यानंतर नातेवाईकांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस सिंडी हिच्या राहत्या गेली आणि पोलिसांना नग्नावस्थेत अडल्ट स्टारचा मृतदेह आढळला.

रिपोर्टनुसार, पोलीस सकाळी 9 वाजता अडल्ट स्टारच्या घरी पोहोचले. तेव्हा अडल्ट स्टार तिच्या घरी नग्न अवस्थेत आढळली. सिंडी हिच्या मानेवर चाकूने वार केले होते. तर तिच्या शारीरावर देखील जखमा असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. सिंडी हिच्या दुसऱ्या बाजूला उशी होती त्यामुळे कळत आहे की तिचा गळा आवळून खून करण्यात आलाय.

सिंडी हिचा बॉयफ्रेंड

मीडिया रिपोर्टनुसार, एक व्यक्ती असा आहे ज्याला सिंडी हिचा बॉयफ्रेंड असल्याचं सांगण्यात येत आहे. तो नेहमी काळ्या रंगाच्या कारमध्ये सिंडी हिच्या घरी यायचा. पण यावर अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शिवाय पोलिसांना त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे की नाही… याबद्दल देखील माहिती मिळू शकलेली नाही.

सिंडी एलिझाबेथ हर्नांडेझ पेरेझ हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, सोशल मीडियावर सिंडी कायम सक्रिय असायची. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. तिच्या मृत्यूची बातमी समोर येताच अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. आता सिंडी हिची हत्या कोणी केली? याचा पोलीस शोध घेत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;