टॉप घालायला विसरलीस का ? अनन्या पांडेच्या बहिणीला वडिलांचा सवाल

टॉप घालायला विसरलीस का ? अनन्या पांडेच्या बहिणीला वडिलांचा सवाल

बॉलिवूडची आघाडीची प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडे नेहमी चर्चेत असते. तिच्या चित्रपटांची, लुक्सची चर्चा होत असते. पण तिच्याप्रमाणचे तिची बहीणही नेहमी चर्चेत असते. अलाना पांडे ही अनन्याची चुलत बहीण असून तिचा सोशल मीडियावर बराच बोलबाला आहे. तिचे फोटोशूट पासून ते तिच्या फॅशन स्टेटमेंटपर्यंत सगळ्या गोष्टींची चर्चा तर होतेच. अलाना ही तिच्या बोल्ड लूक्ससाठी प्रसिद्ध आहे. सध्या ती The Tribe या रिॲलिटी शो मध्ये दिसत आहे. बोल्ड आणि बिनधास्त अलानाने एक तिच्या अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्याची सध्या बरीच चर्चा आहे. पण नंतर काही कारणाने तिने तो काढूनही टाकाल, पण तोपर्यंत तो बराच व्हायरल झाला.

यंग इंडियन इन्फ्लुएन्सर्स लॉस अँडिलिसमध्ये स्वत:ल एस्टॅब्लिश करण्याचा कसा प्रयत्न करत आहेत ते या शोमध्ये दाखवण्यात आले हे. त्यामध्ये जावेद जाफरी याची लेकही आहे.

वडिलांनी विचारलेल्या प्रश्नाने अलाना अस्वस्थ

लानाने या शोमधील एक क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे. जी वेगाने व्हायरल झाली. त्या व्हिडीओमध्ये अलाना तिच्या कुटुंबासोबत बसलेली दिसत आहे. तिने हिरव्या रंगाची ब्रालेट आणि पांढऱ्या रंगाची ट्राऊझर घातली आहे. समोरच तिचे वडील चिक्की पांडे बसलेले दिसतात. अलानाच्या या कपड्यांबद्दल तिचे वडील काही कमेंट करतात, मात्र त्यावरून ती अस्वस्थ , नाराज होते.

टॉप घालायला विसरलीस का ?

अलानाचे वडील चिक्की पांडे तिला विचारतात की तू शर्ट घालायला विसरली आहेस का ? मात्र वडिलांचा हा प्रश्न ऐकून अलाना थोडी अस्वस्थ होते. ती विचारते – तुम्ही काय विचारताय ? या आऊटफिटमध्ये काय प्रॉब्लेम आहे ? ते ऐकून तिचे वडील म्हणतात – की तू शर्ट घालायची गरज आहे, असं वाटत नाही का तुला ? त्यावर अलाना म्हणते – हाच शर्ट आहे.तिचं उत्तर ऐकून तिचे वडील तिला ऐकवतात की – हे वांद्रे आहे, LA ( लॉस अँजिलिस) नव्हे. अलाना म्हणते – हे ( टॉप) ब्रालेट आहे. त्यावर चिक्की पांडे पुन्हा म्हणतात – ब्रालेट ? म्हणजे त्या ब्रा वर कव्हर सले पाहिजे ना, ती झाकलेली असली पाहिजे. त्यांचा हा संवाद ‘द ट्राइब’ शोमधील आहे, त्या व्हिडीओमध्ये अलानाची आईदेखील दिसत आहे. अलानाचा हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे. लोकं त्यावर विविध कमेंट्स करत आहेत.

अलानाचं लग्न झालं आहे. मार्च 2023 मध्ये तिने अमेरिकेतील फोटोग्राफर व व्हिडीओग्राफर Ivor McCray याच्याशी लग्न केलं. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या कुटुंबात छोट्या बाळाचं आगमन झालं. अलानाने एका गोंडस मुलाला जन्म दिला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;