Mumbai महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला त्वरीत वाचा फोडण्याची तरतूद असणारं विधेयक पारित व्हावं! महिलांचे हक्क आणि कायदे विषयावर शिबीर संपन्न

Mumbai महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला त्वरीत वाचा फोडण्याची तरतूद असणारं विधेयक पारित व्हावं! महिलांचे हक्क आणि कायदे विषयावर शिबीर संपन्न

महिला अत्याचार प्रकरणांमध्ये 21 दिवसांत आरोपपत्र, बलात्कारासारखे गुन्हे अजामीनपात्र करणे, अॅसिड हल्ले, सोशल मिडिया, ईमेल मेसेजवर महिलांची बदनामी व छळ केल्यास कठोर कारवाईची तरतूद असणारं शक्ती विधेयक महाविकास आघाडी सरकारच्या काळात मांडण्यात आलं होत. या कायद्याची सध्या नितांत गरज असून आजही आमच्यासारख्या प्रतिष्ठित पदावर असलेल्या महिलांना सामाजिक माध्यमांवर घाणेरड्या पद्धतीनं ट्रोल केलं जातं हे खूप भीषण असून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला त्वरीत वाचा फोडण्याची तरतूद असणारं हे विधेयक पारित व्हावं, अशी मागणी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केली.

षण्मुखानंद हॉल इथं 5 ऑक्टोबर रोजी महिलांचे हक्क आणि कायदे विषयावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची अंगीकृत संघटना शिव विधी व न्याय सेना महाराष्ट्र राज्यच्या वतीनं आयोजित झालेल्या शिबीरात बोलत होत्या.
हिंदू कोड बिलामध्ये स्त्रियांना विवाह, संपत्ती बाबतीत समान अधिकार देण्यात आले असून स्त्रीयांनीच स्वतच्या हक्कांबाबतीत जागरूक राहावं आणि अत्याचारांना तोंड देण्यासाठी सक्षम व्हावं, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या.

शिव विधी व न्याय सेनेच्या वकील पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातल्या विविध शाखा, तालुका, जिल्ह्यांमध्ये जाऊन गरजू महिलांना आवश्यक कायदेशीर मदत आणि मार्गदर्शन करावं अशी विनंती माजी महापौर विशाखाताई राऊत यांनी केली.
नवरात्रीनिमित्त महिलांना हळदीकुंकुवाच्या कार्यक्रमाबरोबर कायदेशीर प्रबोधनाची तेवढीच आवश्यकता असून असा वेगळा उपक्रम महिलांसाठी राबवल्याबद्दल माजी महापौर विशाखाताई राऊत यांनी शिव विधी व न्याय सेनेला शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेविका नंदिनी विचारे, महिला आघाडीच्या रंजना नेवाळकर, विभाग संघटिका पद्मावती शिंदे यांच्यासह पक्षाच्या जिल्हा महिला संघटका, माजी नगरसेविका, संपर्क, शाखाप्रमुख आणि महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी संघटनेच्या उपाध्यक्ष ॲड. सुरेखा गायकवाड होत्या त्यांनी यावेळी उपस्थित महिलांना संबधित फौजदारी कायद्यांबद्दल माहिती दिली. तर कोकण गोवा सचिव ॲड. स्वप्ना कोदे यांनी सायबर गुन्हे, हॅकिंग, बॅंकिंग फ्रॉड, डेटाचा गैरवापर याबद्दल माहिती दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष ॲड. नितिशजी सोनावणे, चिटणीस ॲड . सुमीत घाग, मुख्य समन्वयक ॲड.भूषण मेंगडे, चिटणीस ॲड. ज्ञानेश्वर कवळे, मीडिया समन्वयक ॲड. दर्शना जोगदनकर, ॲड सोनाली मयेकर, ॲड. कोजल कदम, ॲड. वर्षा जगताप, ॲड. शीतल मोहिले, ॲड सुषमा थोरात, ॲड.रेश्मा ठिकार, ॲड. धनराज कांबळे, ॲड. विकास गोरडे यांच्यासह इतर वकील पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ॲड भक्ती दांडेकर यांनी केलं.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;