Kareena Kapoor: माता सीता यांच्यासोबत स्वतःची तुलना, वादाच्या भोवऱ्यात अडकली करीना, अनेकांमध्ये संताप

Kareena Kapoor: माता सीता यांच्यासोबत स्वतःची तुलना, वादाच्या भोवऱ्यात अडकली करीना, अनेकांमध्ये संताप

अभिनेत्री करीना कपूर हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. पण अभिनेत्री आता असं काही बोलली ज्यामुळे अनेकांनी करीनाला ट्रोल केलं आहे. नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात करीना हिने स्वतःची तुलना माता सीता यांच्यासोबत केली आहे. ज्यामुळे अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे .

सध्या करीना कपूर हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री माता सीता यांच्याबद्दल बोलताना दिसत आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘माता सीता यांच्या शिवाय रामायण पूर्ण होऊ शकत नाही, त्याच प्रमाणे करीना कपूर शिवाय रोहित शेट्टी याचा सिनेमा पूर्ण होऊ शकत नाही…’ सध्या व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

 

अभिनेत्रीच्या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘कमाल उदाहरण आहे, आजपर्यंत हे ऐकलं नाही…’, दुसरा नेटकरी म्हणाली, ‘ही काय वायफळ बडबड करत आहे…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘स्वतःची तुलना देवासोबत करत आहे…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘हे रोहित यानेच शिकवलं असेल…’, सध्या सर्वत्र करीना हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

करीना हिच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात करीना हिच्यासोबत अजय देवगन, दीपिका पादुकोण, अक्षय कुमार, रणवीर सिंग, अर्जुन कपूर आणि टायगर श्रॉफ महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चाहते देखील सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

करीना कपूर खान

करीना कपूर फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. करीना हिने अनेक वर्ष अभिनेता सैफ अली खान याला डेट केल्यानंतर लग्न केलं. लग्नानंतर अनेकांनी अभिनेत्रीला ट्रोल केलं. पण दोघांनी कोणत्याच गोष्टीकडे अधिक लक्ष न देता फक्त स्वतःच्या भावनांना महत्त्व दिलं. करीना आणि सैफ यांच्या नात्याबद्दल देखील अनेक चर्चा रंगलेल्या असतात.

सैफ याच्यासोबत लग्न केल्यानंतर करीना हिने दोन मुलांना जन्म दिला. करीना – सैफ यांच्या मोठ्या मुलाचं नाव तैमून अली खान, तर दुसऱ्या मुलाचं नाव जेह अली खान असं आहे. करीना कायम मुलांसोबत देखील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;