Nikki Tamboli: कधी आणि कोणासोबत रिलेशनशिपमध्ये येणार निक्की तांबोळी? स्वतःच केला मोठा खुलासा

Nikki Tamboli: कधी आणि कोणासोबत रिलेशनशिपमध्ये येणार निक्की तांबोळी? स्वतःच केला मोठा खुलासा

Nikki Tamboli: अभिनेत्री आणि सोशल मीडिया स्टार निक्की तांबोळी तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी तर, खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. ‘बिग बॉस मराठी 5’ मध्ये निक्की अभिनेता अरबाज पटेल याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे अधिक चर्चेत आली. सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल झाले. याआधी देखील निक्कीचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं होतं. पण एका मुलाखतीत निक्की हिने जोडीदाराबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं.

2021 मध्ये झालेल्या एका मुलाखतीत निक्की हिने जोडीदाराबद्द मोठं वक्तव्य केलं होतं. ‘माझ्याकडे सध्या वेळ नाही. मला माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करायचं आहे. माझ्या कामातून मला आनंद मिळत आहे. मला माझा वेळ कुटुंबासोबत घालवायचा आहे. मी सध्या जोडीदाराची प्रतीक्षा करत नाही…’

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Arbaz Shaikh (@mr.arbazpatel)

 

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘रिलेशनशिपला अधिक वेळ द्यावा लागतो आणि यावेळी माझ्याकडे वेळ नाही. मला माझं काम वेळेत पूर्ण करायचं आहे. माझे काही ध्येय आहे, जे मला पूर्ण करायचे आहेत. सध्या तरी माझ्या आयुष्यात जोडीदारासाठी कोणतीच जागा नाही… मी सध्या तरुण आहे. रिलेशनशिप आणि इतर गोष्टींसाठी संपूर्ण आयुष्य बाकी आहे…’

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikki Tamboli (@nikki_tamboli)

 

निक्कीला कसा जोडीदार हवा आहे असा देखील प्रश्न विचारण्यात आला. ‘मला उंच, आकर्षक व्यक्तीमत्व आणि ज्याच्याकडे सिक्स पॅक एब्स असतील असा मुलगा मला हवा आहे. एवढंच नाही तर, इंडस्ट्रीमधील जोडीदार मला नको आहे. कारण स्क्रिनवर इंटिमेट सीन करण्यासाठी मला आवडणार नाही.’ असं देखील निक्की म्हणाली होती.

सांगायचं झालं तर, निक्की कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. बिग बॉसमुळे तिच्या चाहत्यांच्या संख्येत देखील मोठी वाढ झाली आहे. ‘बिग बॉस मराठी’ शोचं पाचवं पर्व हे अभिनेत्री आणि सोशल मीडिया स्टार निक्की तांबोळी हिच्यामुळे रंगात आला असं म्हणायला हरकत नाही. निक्कीने प्रत्येक टास्क पूर्ण केला. शिवाय, काही झालं तरी निक्कीच्या तोंडून निघणारा ‘बाई…’ हा शब्द तर सोशल मीडियावर ट्रेंड झाला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;