रत्नागिरी स्टेशनचे छत उद्घाटनाआधीच कोसळले
रत्नागिरी रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वार सुशोभिकरणाचा उदघाटन सोहळा आचारसंहितेच्या पुर्वी आटोपण्याची घाई सुरु असलेल्या कामाचा सोसाटय़ाच्या वाऱयाने बोजवारा उडवला. सोसाटय़ाच्या वाऱयाने प्रवेशद्वाराच्या छपरावरील पीओपी शीटस कोसळल्या. घाईगडबडीतल्या कामामुळे सुशोभिकरणाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे, मिंधे सरकारच्या राजवटीमध्ये अशी तकलादू कामे आता जनतेसमोर येत आहेत. रत्नागिरी रेल्वेस्थानकाच्या सुशोभिकरणाचे 9 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता उद्घाटन होणार असून छताचा भाग कोसळल्याने या कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, हा व्हिडीयो पोस्ट करत महाराष्ट्रात खोके आणि धोके सरकार असून येथील जनता लवकरच हिशेब करेल, असा हल्ला काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List