भाजप कार्यकर्त्यांनी उदय सामंतांना काळे झेंडे दाखवले, वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला जाताना घडली घटना

भाजप कार्यकर्त्यांनी उदय सामंतांना काळे झेंडे दाखवले, वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला जाताना घडली घटना

रत्नागिरीतील वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला जात असताना रत्नागिरीचे पालकमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांना सकल हिंदू समाज आणि भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. सकल हिंदू समाजाने वक्फ बोर्डाच्या कार्यालयाला विरोध केला आहे. उद्योगमंत्र्यांचीच गाडी अडवण्याचा प्रयत्न सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यावेळी पोलीसांनी त्यांना रोखले.

सामाजिक न्याय भवन येथे वक्फ बोर्डाचे कार्यालय सुरु करण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होते. ते उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जात असताना सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला. यावेळी एक कार्यकर्ता काळा झेंडा घेऊन उदय सामंत यांची गाडी अडवण्यासाठी पुढे धावला. मात्र पोलिसांनी त्याला रोखले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;