रश्मी शुक्लांना पोलीस महासंचालक पदावरून हटवा, नाना पटोले यांचे निवडणूक आयोगाला रिमाइंडर

रश्मी शुक्लांना पोलीस महासंचालक पदावरून हटवा, नाना पटोले यांचे निवडणूक आयोगाला रिमाइंडर

राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांना सरकारने बेकायदेशीरपणे मुदतवाढ दिली असून त्या येत्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या फायद्यासाठी यंत्रणेत हस्तक्षेप करू शकतात असा आरोप करत त्यांना तातडीने पदावरून हटवण्यात यावे, असे स्मरणपत्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला दिले आहे.

रश्मी शुक्ला यांच्यावर अनेक गंभीर गुह्यांची नोंद आहे. त्या भारतीय जनता पक्षासाठी काम करतात असे पटोले यांनी या पत्रात नमूद केले आहे. शुक्ला पोलीस महासंचालक पदावर राहिल्या तर आगामी विधानसभा निवडणूक पारदर्शक व निःपक्षपातीपणे पार पडणार नाही, असेही पटोले यांनी म्हटले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना 24 सप्टेंबर रोजी नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली होती. रश्मी शुक्ला यांची हकालपट्टी करा, असे निवेदन त्यांनी दिले होते. परंतु निवडणूक आयोगाने अद्याप त्यावर काहीच कारवाई केलेली नाही. शुक्ला यांची अलीकडील नियुक्ती आणि त्यानंतर त्यांना दिलेली मुदतवाढ पोलीस कायदा आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नियमांचे उल्लंघन करणारी असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;