सिंधू, लक्ष्य सेनच्या कामगिरीकडे नजरा, आर्कटिक ओपन बॅडमिंटन स्पर्धा आजपासून

सिंधू, लक्ष्य सेनच्या कामगिरीकडे नजरा, आर्कटिक ओपन बॅडमिंटन स्पर्धा आजपासून

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये निराशाजनक कामगिरी केल्यानंतर पी. व्ही. सिंधू व लक्ष्य सेन फिनलॅण्डमधील आर्कटिक ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे तमाम देशवासियांच्या नजरा हिंदुस्थानच्या या स्टार खेळाडूंच्या कामगिरीकडे असतील.

पी. व्ही. सिंधू या स्पर्धेत कॅनडाच्या मिशेल ली हिच्याविरूद्धच्या लढतीने आपल्या अभियानास सुरूवात करणार असून, लक्ष्य सेनची सलामी डेन्मार्कच्या रासमस गेम्के याच्याशी झडणार आहे. सिंधूने विजयी सलामी दिल्यास दुसर्‍या फेरीत तिच्यापुढे जपानच्या १८ वर्षीय टोमाको मियाजाकी हिचे आव्हान असेल. या वर्षाच्या प्रारंभी स्विस ओपनमध्ये याच टोमाकोने सिंधूला हरविले होते. पुरूष एकेरीत सेनला पहिल्याच लढतीत रासमस गेमकेला हरवून उट्टे काढण्याची संधी असेल. कारण गतवर्षी इंडिया ओपनमध्ये सेन रासमसकडूनच पराभूत झाला होता. याचबरोबर दुखापतीमुळे चार महिने कोर्टपासून दूर राहिलेला किदाम्बी श्रीकांतही आर्कटिक ओपन बॅडमिंटन स्पर्धेतून पुनरागमन करणार आहे. मात्र, तो किरण जॉर्ज व सतीश कुमार या आपल्या देशसहकार्‍यांसह पात्रता फेरीतून अभियानास प्रारंभ करेल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;