Sangli News – भाजपच्या बैठकीत राडा; दोन गट भिडले, स्थानिक कार्यकर्त्यांचा गोपीचंद पडळकरांना विरोध

Sangli News – भाजपच्या बैठकीत राडा; दोन गट भिडले, स्थानिक कार्यकर्त्यांचा गोपीचंद पडळकरांना विरोध

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मतदारांना आकर्षीत करण्यासाठी आणि डावपेचांचे नियोजन करण्यासाठी बैठका आणि भेटीघाठींचे सत्र सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात पहायला मिळत आहे. मात्र यामुळे भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहे. सांगलीतील जत तालुक्यात भाजपच्या बैठकीत उमेदवारीवरुन दोन गटात राडा झाला आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांना स्थानिक कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषगांने भाजपने सांगतीलीत जत तालुक्यात बैठकीचे आयोजन केले होते. मात्र या बैठकीत भूमिपुत्राच्या प्रश्नावरुन दोन गटात राडा झाला. भाजपच्या तमनगौडा रवी पाटील यांच्या पदाधिकाऱ्यांनी जतमध्ये भुमिपुत्रालाच संधी द्यावी अशी आग्रही मागणी केली. मात्र या मागणीवर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी आक्षेप घेतला. दोन्ही बाजूने एकमेकांवर शाब्दिक वार करण्यात आले मात्र कोणीही शांत राहण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर वरिष्ठांनी मध्यस्थी केली आणि कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.

जत विधानसेभासाठी भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर इच्छूक आहेत. मात्र भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये यामुळे नाराजीचे वातवरण आहेत. कारण जतमधून तमन्नागौडा रवी पाटील, प्रकाशराव जमदाडे सुद्धा इच्छूक आहे. भाजपने अद्याप कोणालाही उमेदवारी जाहीर केली नाही. असे असले तरी, पडळकर आणि रवी पाटिल गटांकडून मोर्चे बांधणी सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;