हरयाणा, जम्मू-कश्मीरमध्ये उद्या मतमोजणी, सकाळी दहा वाजेपर्यंत कल कळणार

हरयाणा, जम्मू-कश्मीरमध्ये उद्या मतमोजणी, सकाळी दहा वाजेपर्यंत कल कळणार

हरयाणा आणि जम्मू-कश्मीर विधानसभेसाठी घेण्यात आलेल्या मतदानाची मतमोजणी मंगळवारी करण्यात येणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार असून, अगोदर टपाली मते मोजण्यात येतील. सकाळी १० वाजेपर्यंत दोन्ही राज्यांचा कल हाती येण्याची शक्यता आहे.

जम्मू-कश्मीरमध्ये 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि १ ऑक्टोबरला तर हरयाणात 5 ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान घेण्यात आले. हरयाणात 90 तर जम्मू-कश्मीरमध्येही 90 जागांसाठी मतदान झाले. मतदानोत्तर चाचण्यांमध्ये दोन्ही राज्यांत मतदारांनी भाजपला अव्हेरल्याचे चित्र समोर आले होते. मंगळवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार असून, सुरुवातीला टपाली मते मोजण्यात येणार आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी करण्यात येईल.

जम्मू-कश्मीरमध्ये कलम 370 काढल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद, कश्मीरमधील घराणेशाही आदी विषय या निवडणुकीत चर्चेत आले. परंतु, सर्वात अधिक चर्चा कश्मिरी तरुणांच्या रोजगारावर झाली. हरयाणातही भाजपविरोधातील रोष प्रकट झाला. अग्निवीर, शेतकर्‍यांचे प्रश्न, महिला कुस्तीपटूंवरील अन्याय आदी विषय हरयाणा निवडणुकीत ज्वलंत होते.

एक्झिट पोलनुसार हरयाणात काँग्रेस

हरयाणा आणि जम्मू-कश्मीरच्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. दोन्ही राज्यांतील विधानसभेचा निकाल 8 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. त्याआधी एक्झिट पोल समोर आले असून हरयाणामध्ये भाजपला मोठा धक्का बसताना दिसत आहे. एक्झिट पोलनुसार दहा वर्षांनंतर काँग्रेस सत्तेत येताना दिसत आहे. तर जम्मू-कश्मीरमध्ये इंडिया आघाडीचे घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेस आणि नॅशल कॉन्फरन्स या दोन पक्षांची सरशी होताना दिसत असून केंद्रातील सत्ताधारी भाजपला हा मोठा धक्का आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;