#Deepveer रणवीर- दीपिकाच्या मुलीची जन्माआधीच बॉलीवूडमध्ये एन्ट्री!
बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाच्या ट्रेलरची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. अशातच सोमवारी ‘सिंघम अगेन’चा लॉन्च सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र या सोहळ्यात चित्रपटातील लेडी सिंघम अभिनेत्री दीपिका पादुकोण उपस्थित नव्हती. त्यामुळे चाहते नाराज झाले. मात्र रणवीर या सोहळ्यात उपस्थित होता. यासोबत इतर कलाकारांनीही हजेरी लावली. यावेळी प्रत्येकाने आपली प्रतिक्रिया दिली.
सोशल मीडियावर या सोहळ्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. मात्र रणवीरच्या व्हिडीओने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. ट्रेलर लाँचच्या वेळी रणवीर त्याची मुलगी आणि दीपिकाबद्दल बोलताना दिसला. मीडियाशी बोलताना रणवीर म्हणाला- मुलगी झाली हो…! दीपिका सध्या बाळासोबत बिझी आहे त्यामुळे ती येऊ शकली नाही. माझी ड्युटी रात्रीची आहे म्हणून मी आलो. आमच्या चित्रपटात अनेक स्टार्स आहेत. त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो की, हा माझ्या लेकीचा बेबी सिम्बाचा डेब्यू आहे. कारण सिंघमच्या शूटिंगच्या वेळी दीपिका गरोदर होती. लेडी सिंघम, सिम्बा आणि बेबी सिम्बा कडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या आगाऊ शुभेच्छा… असे तो यावेळी म्हणाला.
‘सिंघम अगेन’ हा चित्रपट 1 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. अजय देवगणसोबतच करीना कपूर, अक्षय कुमार, रणवीर सिंग, करीना कपूर, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर आणि जॅकी श्रॉफ हे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटात दीपिका पदुकोणने लेडी सिंघमची भूमिका साकारली आहे. त्यामुळे सर्वांनाच या चित्रपटाची उत्सुकता आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List