Buldhana News – दिशा बचत गट फेडरेशनचे कार्य कौतुकास्पद; प्रदर्शनी समारोप कार्यक्रमात राधेश्याम चांडक यांचे वक्तव्य

Buldhana News – दिशा बचत गट फेडरेशनचे कार्य कौतुकास्पद; प्रदर्शनी समारोप कार्यक्रमात राधेश्याम चांडक यांचे वक्तव्य

दिशा बचत गट फेडरेशनचे कार्य कौतुकास्पद आहे. ग्रामीण महिलांना आत्मविश्वास देण्याचे काम जयश्रीताईंनी केले आहे, असे प्रतिपादन बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक उर्फ भाईजी यांनी महिला उद्योजक तथा बचत गट प्रदर्शनीच्या समारोपीय कार्यक्रमात केले. जयश्रीताई शेळके यांनी बुलढाणा येथे दिशा बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून तीन दिवसीय भव्य बचत गट प्रदर्शनीचे आयोजन केले होते. त्याचा समारोप काल पार पडला. यावेळी समारोपीय भाषणात भाईजी बोलत होते.

या प्रदर्शनीमध्ये तळागाळातील महिलांची उस्फूर्त उपस्थिती लाभली. महिलांनी आणलेले गृह उपयोगी पदार्थ, खाद्य पदार्थांची रेलचेल, बचत गटाच्या महिलांचे विविध स्टॉल, त्यामध्ये झालेली करोडो रुपयांची उलाढाल पाहता ‘दिशाचे’ आयोजन कमालीचे यशस्वी ठरले. यावेळी प्रदर्शनीमध्ये भाग घेणाऱ्या काही महिलांचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते पार पडले. यावेळी बचत गटाच्या महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;