Photo – राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर; टेम्पोचालकाच्या घरी दिली भेट
‘इंडिया’ आघाडीतील काँग्रेसचे नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्य़ा कोल्हापूर दौऱ्यात आहेत. यावेळी त्यांनी उचगाव तेथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरमध्ये राहणाऱ्या टेम्पोचालक अजित तुकाराम संदे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी संधे यांच्या स्वयंपाक घरात जाऊन हरभऱ्याची भाजी, वांग्याची भाजी, तुरीची डाळ व भाकरी बनवली व त्यांच्यासोबत जेवण केले. राहुल गांधी यांनी तुकाराम संधे व अंजना तुकाराम संधे यांच्याशी यावेळी तासभर चर्चा केली. आसपासच्या नागरिकांना राहुल गांधी आल्याची बातमी समजताच त्यांनी संदे यांच्या घराभोवती एकच गर्दी केली. पाऊण तासानंतर सर्वसामान्यांशी हस्तांदोलन करीत राहुल गांधी निघाले.



About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List