वेंगुर्लेची शेफाली खांबकर बनली पहिली ‘गल्फ सुपर शेफ’, दुबई मध्ये झाली घोषणा

वेंगुर्लेची शेफाली खांबकर बनली पहिली ‘गल्फ सुपर शेफ’, दुबई मध्ये झाली घोषणा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्लेची सुकन्या शेफाली खांबकर हिला पहिली ‘गल्फ सुपर शेफ’ होण्याचा बहुमान मिळाला आहे. रविवारी संध्याकाळी दुबई मध्ये झालेल्या एका ग्रँड सोहळ्यात तीन हजार स्पर्धकांमधुन शेफाली खांबकर च्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

बिईंग मुस्कान आणि एस व्ही के यांच्या माध्यमातून दुबई मध्ये पहिल्या गल्फ सुपर शेफ या अत्यंत मानाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्ध मध्ये युएइ मधील अनेक नामवंत शेफ नी सहभाग घेतला होता. यूएई च्या विविध भागातून तीन हजार हुन अधिक शेफ यात सहभागी झाले होते. गेले काही दिवस सेलिब्रिटी शेफच्या उपस्थितीत विविध फेऱ्या मधून पहिल्या सर्वोत्तम बारा शेफची निवड करण्यात आली.सलग तीन दिवस विविध फेऱ्यांमधून पाहिल्या टप्यात आठ आणि नंतर अंतिम तीन शेफ ची निवड करण्यात आली.पंचतारांकित पदार्थांपासून स्ट्रीट फूड अशा विविध फेऱ्या जागतिक दर्जाच्या शेफ कडून या स्पर्ध दरम्यान घेण्यात आल्या.

रविवारी 6ऑक्टोबर ला सायंकाळी दुबई मध्ये झालेल्या ग्रँड फिनाले मध्ये शेवटच्या तीन स्पर्धकांमध्ये शेफाली खांबकर निवडली गेली होती.या ग्रँड सोहळ्यात शेफाली खांबकर पहिली गल्फ शेफ बनल्याची घोषणा करण्यात आली. सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांच्या हस्ते शेफाली हिला गल्फ शेफ ट्रॉफी,प्रमाणपत्र,भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.गल्फ मध्ये झालेल्या या पहिल्या भव्यदिव्य स्पर्ध्येत अव्वल ठरत एका कोकण कन्येने गल्फ मधील या मानाच्या चषकावरआपले नाव कोराल्यामुळे तीचे विशेष अभिनंदन होत आहे. शेफाली वेंगुर्ल्यातील पाटकर हायस्कूल ची विद्यार्थिनी आहे.

गल्फमधील ही मानाची स्पर्धा जिंकल्या नंतर प्रतिक्रिया देताना शेफाली ने “माझ्यासाठी हि फार मोठी अचिव्हमेंट आहे.स्वप्न सत्यात उतरले आहे असा वाटतंय.अर्थात या सगळ्यात माझे पती चेतन किन्नरकर,सासूबाई यांचा सगळ्यात मोठा सपोर्ट होता.कोकणातील तुलनेने छोट्या पणं सुंदर शहरातून मला सतत पाठबळ देणाऱ्या माझ्या आई वडील ,बहिणीमुळे इथ पर्यंत आले” अशा भावना शेफालीने व्यक्त केल्या.

रविवारी दुबई मध्ये शेफालीच्या नावाची घोषणा झाल्यानंतर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शेफाली वेंगुर्ल्यातील ज्येष्ठ नाट्यकर्मी सुरेंद्र उर्फ बाळू खांबकर आणि सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी संध्या खांबकर यांची कन्या आहे. शेफाली च्या या यशानंतर मुलीच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहिलेल्या या दोघांचे ही विशेष अभिनंदन केले जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;