प्रसिद्ध गायकाकडून कंगना रणौतवर संताप व्यक्त; म्हणाला, ‘एक्सपोज करेल, दारु ड्रग्स घेऊन ती…’

प्रसिद्ध गायकाकडून कंगना रणौतवर संताप व्यक्त; म्हणाला, ‘एक्सपोज करेल, दारु ड्रग्स घेऊन ती…’

अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात असतात. आता देखील कंगना यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. नुकताच झालेल्या एका सभेत कंगना रानौत यांनी पंजाब बद्दल वादग्रस्त विधान केलं होते. ‘पंजाब येथून चिट्टासोबत अनेक गोष्टी आपल्या भागात येत आहे. तरुण वर्ग ड्रग्ल आणि नशेत स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहे…’, कंगनाच्या या विधानावर पंजाबी गायक जस्सी गिल यांनी नाराजी व्यक्त करत कंगना यांच्याबद्दल धक्कादायक दावे केले आहे. कंगना एकदा प्रचंड दारू प्यायल्या होत्या आणि त्यांना उभं देखील राहता येत नव्हतं…

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत जस्सी गिल याने कंगना यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ‘कोणत्या स्त्रीबद्दल मला बोलायचं नाही. पण कंगना यांनीचं मला बोलण्यासाठी भाग पाडलं आहे. कंगना सतत पंजाबवर निशाणा साधत आहेत. दिल्लीत त्यांनीच प्रचंड दारू प्यायली होती. ड्रग्स घेतले होते. त्या सतत पंजाब बद्दल बोलणार असतील मी देखील अनेक गोष्टी समोर आणेल… कंगना यांना मी एक्सपोज करेल.’ असं देखील जस्सी गिल म्हणाला.

 

 

पुढे जस्सी गिल म्हणाले, ‘कंगना यांच्याकडे कोणी अधिक लक्ष द्यायला नको. त्या मानसिक रुग्ण आहेत. त्यांचं मानसिक संतुलन ठिक नाही. अशी लोकं संसदेत बसून देशासाठी निर्णय घेत आहेत…’, जस्सी गिल यांच्या अशा वक्तव्यावर कंगना यांच्या प्रतिक्रिया काय असेल पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कंगना रणौत यांचं प्रोफेशनल आयुष्य

कंगना रणौत यांच्या प्रोफेशन आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा राजकारणाच्या दिशेने वळवला आहे. आता कंगना लवकरच ‘इमरजेन्सी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. पण सिनेमाच्या प्रदर्शनाची तारिख अद्याप ठरलेली नाही. सिनेमात कंगना हिने दिवंगत नेत्या इंदिरा गांधी यांची भूमिका बजावली आहे. शिवाय सिनेमाचं दिग्दर्शन देखील कंगना यांनी केलं आहे. आता सिनेमा मोठ्या पडद्यावर कधी प्रदर्शित होतो पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;