भोसरीचे आमदार महेश लांडगेंना धक्का; भाजपला ‘रामराम’ करत लक्ष्मण सस्ते यांचा तुतारी फुंकण्याचा निर्धार

भोसरीचे आमदार महेश लांडगेंना धक्का; भाजपला ‘रामराम’ करत लक्ष्मण सस्ते यांचा तुतारी फुंकण्याचा निर्धार

लोकसभा निवडणुकीतील दमदार ‘स्ट्राईक रेट’मुळे महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करण्यासाठी नेत्यांची रीघ लागली आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही महाविकास आघाडीचे पारडे जड असल्याचे अनेक सर्व्हेतून समोर आले आहे. त्यामुळे एकामागोमाग एक नेते महाविकास आघाडीची कास धरत आहेत. आता भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांना तगडा धक्का बसला असून भाजपचे माजी क्रीडा सभापती लक्ष्मण सस्ते यांनी त्यांची साथ सोडत तुतारी फुंकण्याचा निर्धार केला आहे.

क्रीडा समितीचे माजी सभापती व माजी नगरसेवक लक्ष्मण सस्ते हे भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक समजले जात होते. मात्र सस्ते यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला रामराम करण्याचा निर्धार केला आहे.

बीआरएस पक्ष राष्ट्रवादीत विलीन

सस्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अजित गव्हाणे यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. मोशी भागामध्ये सस्ते यांना मानणारा मोठा वर्ग असून त्यांच्यापाठोपाठ आणखीही काही लोक भाजपची साथ सोडण्याची शक्यता आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;