व्हॉट्सअ‍ॅपवर आता मोबाईल नंबर नसतानाही करा चॅटिंग

व्हॉट्सअ‍ॅपवर आता मोबाईल नंबर नसतानाही करा चॅटिंग

करोडो युजर्सच्या सोयीसाठी व्हॉट्सअ‍ॅप नेहमी नवीन फीचर घेऊन येत असते. आताही व्हॉट्सअ‍ॅप एका अफलातून फीचरवर काम करत आहे. युजरनेम फीचर असे त्याचे नाव आहे. यामध्ये एखाद्याचा मोबाईल नंबर नसतानाही आपण त्याच्याशी व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग करू शकणार आहोत.

खरं तर व्हॉट्सअ‍ॅप हे फोन नंबरवर चालणारे अ‍ॅप आहे, पण त्यात लवकरच युजरनेम वापरण्याची सुविधा येणार आहे. डब्ल्यूएबीटाइन्पह्च्या रिपोर्टनुसार, युजरनेमच्या आधारे एखाद्याचा नंबर नसतानाही त्याच्याशी चॅट करू शकता. सुरुवातीला ही सुविधा व्हॉट्सअ‍ॅप वेबसाठी उपलब्ध होणार आहे. त्याच्या लाँचिंगची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामप्रमाणे व्हॉट्सअ‍ॅपवरही युजरला स्वतःचे युजरनेम बनवता येईल. हे युजरनेम पूर्ण वेगळे असेल आणि ते तुमच्याच नावावर असेल. तुमच्या फोन नंबरशिवाय एखाद्या वेगळ्या ओळखीने तुम्ही इतरांशी चॅट करू शकाल. ज्यांच्याकडे तुमचा फोन नंबर आहे, असे युजर तुम्हाला पूर्वीप्रमाणेच शोधू शकतील. तुम्ही कुणाला संपर्क करू द्यायचा आणि कुणाला नाही, यावर तुमचे नियंत्रण असेल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;