आयफोनचा वापर होणार अधिक सोपा; सर्व त्रुटी होणार दूर, आयओएस 18.1 केले अपडेट

आयफोनचा वापर होणार अधिक सोपा; सर्व त्रुटी होणार दूर, आयओएस 18.1 केले अपडेट

अ‍ॅप्पल कंपनीने आयओएस 18.1 अपडेट केले आहे. त्यामुळे आयफोनचा वापर करणे युजर्ससाठी अधिक सोपे होणार आहे. आयओएस 18 नंतर तीन आठवड्यांनंतर 18.1 अपडेट आणले आहे. त्यामुळे आयफोन युजर्सची बग किंवा त्रुटींपासून सुटका होणार आहे. कॅमेऱ्याची समस्यादेखील नसेल. याशिवाय आयफोन 16वर मायक्रोफोन अ‍ॅक्सेससाठी आणि पासवर्ड अ‍ॅप अ‍ॅक्सेससाठीदेखील या फोनचा वापर अधिक सोपा असणार आहे.  अ‍ॅप्पल आयओएस 18.1 बिल्ड नंबरला 22ए3370 वर अपडेट करतो. आयफोनमधील त्रुटी दूर करण्याच्या दृष्टीने हे अपडेट करण्यात आले आहे.

हे अपडेट एलिजिबल असलेल्या सर्व आयफोन मॉडेल्ससाठी लागू असणार आहेत. हे नवीन अपडेट आयफोनला अधिक सुरक्षा प्रदान करेल आणि सर्व त्रुटींवर उत्तम उपाय ठरेल असा दावा कंपनीने केला आहे. या नव्या अपडेटमुळे आयफोन 16 आणि आयफोन 16 प्रो मॉडेलवर टचस्क्रीन आणि अनरिस्पॉन्सिव यांसारख्या समस्यांपासूनदेखील आयफोन युजर्सची सुटका होणार आहे.

नवीन अपडेटसाठी काय करावे?

नवीन अपडेट इन्स्टॉल करावे लागेल. ही अतिशय सोपी प्रक्रिया आहे. त्यासाठी आयफोनमध्ये सेटिंग्समध्ये जावे लागेल. त्यानंतर जनरलवर क्लिक करून मग सॉफ्टवेअर अपडेटवर क्लिक करा. क्लिक करताच अपडेट फोनमध्ये डाऊनलोड होईल आणि इन्स्टॉलदेखील होईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;