तुरुंगातील कैद्याकडून निक्कीला यायचे लाखो रुपये, महागड्या भेटवस्तू! नक्की काय आहे सत्य?

तुरुंगातील कैद्याकडून निक्कीला यायचे लाखो रुपये, महागड्या भेटवस्तू! नक्की काय आहे सत्य?

Nikki Tamboli: सोशल मीडिया स्टार आणि अभिनेत्री निक्की तांबोळी सध्या ‘बिग बॉस मराठी 5’ शोमुळे चर्चेत आहे. ‘बिग बॉस’ मध्ये दमदार स्पर्धक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर निक्कीच्या चाहत्यांच्या संख्येत देखील मोठी वाढ झाली आहे. आता दिवसागणिक निक्कीच्या चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा निक्की वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. एका तुरुंगातील कैद्यासोबत अभिनेत्रीचं कनेक्शन असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता.

तुरुंगातून अभिनेत्रीला लाखो रुपये आणि महागड्या भेटवस्तू देखील यायच्या… अशी माहिती देखील समोर आली होती. ज्या कैद्यासोबत निक्कीच्या नावाची चर्चा रंगली होती तो कैदी दुसरा तिसरा कोणी नाही तर आरोपी सुकेश चंद्रशेखर आहे. 200 कोटींच्या फसवणुकीचे आरोप असलेल्या सुकेश यांचं सिनेविश्वातील अनेक अभिनेत्रींसोबत खासगी संबंध असल्याची माहिती समोर आली होती.

ईडीने चौकशी सुरु केल्यानंतर तपासात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांच्यानंतर निक्की तांबोळी हिचं नाव देखील समोर आलं. रिपोर्टनुसार, निक्की तांबोळी, सुकेश याला भेटण्यासाठी तिहार जेलमध्ये देखील गेली होती. पिंकी इराणी हिच्या माध्यमातून निक्की आणि सुकेश यांची भेट झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सुकेश याने पिंकी हिला 10 लाख रुपये दिले होते. त्यामधील दीड लाख निक्की हिला द्यायचे होते. त्यानंतर निक्की ही सुकेशला भेटण्यासाठी तुरुंगात गेली. तेव्हा सुकेशने अभिनेत्रीला आणखी 2 लाख आणि गुच्चीची एक बॅग दिली होती. याप्रकरणी निक्कीची चौकशी देखील करण्यात आली होती.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

 

निक्की हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, निक्की सिनेमांमध्ये दिसत नसली तरी, सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अभिनेत्री तेलगू आणि तामिळ सिनेमांमध्ये काम केलं आहे. शिवाय ‘बिग बॉस’ आणि ‘खतरों के खिलाड़ी’ मध्ये देखील निक्की झळकली आहे. शिवाय अभिनेत्री अनेक म्यूझीक व्हिडीओमध्ये देखील काम केलं आहे. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;