छत्रपती संभाजीनगर, जालन्यात एनआयएचे छापे!, तीन जणांना ताब्यात घेतले; जैश ए मोहंमदशी संबंध असल्याचा संशय

छत्रपती संभाजीनगर, जालन्यात एनआयएचे छापे!, तीन जणांना ताब्यात घेतले; जैश ए मोहंमदशी संबंध असल्याचा संशय

शनिवारी मध्यरात्री 2 वाजता राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात ‘एनआयए’ने छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे एटीएसच्या मदतीने छापेमारी करून कश्मीर कनेक्शन आणि जैश ए मोहमद अतिरेकी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून तीन जणांना ताब्यात घेतले. त्यापैकी एक जालना येथील असून दोघे छत्रपती संभाजीनगरमधील असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान दोघांना चौकशी करून सोडून देण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरात महिनाभरापूर्वी टेरर फंडिंग प्रकरणात ‘एनआयए’ने चौकशी केली होती. त्यानंतर शहरातील काही मोहल्ल्यांवर एटीएसकडून पाळत ठेवण्यात आली. तीन दिवसांपासून किराडपुरा, कटकटगेट भागातही ‘एनआयए’ने खबरे पेरले होते. आज पहाटे किराडपुरा परिसरातील एका घरावर छापा टाकून मौलाना इलियास याला ताब्यात घेण्यात आले. मौलाना इलियास हा पदवीधर असून मदरशात शिक्षक आहे. त्याचबरोबर सिडको एन 6 भागातून मौलाना सत्तार यालाही ताब्यात घेण्यात आले. इलियास आणि सत्तार या दोघांची सहा तास कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर या दोघांनाही सोडून देण्यात आले.

‘एनआयए’ आणि ‘एटीएस’चे पथक तीन दिवसांपासून जालना शहरात तळ ठोकून होते. चमडाबाजार भागातील एका घरावर या पथकाने पाळत ठेवली होती. माहितीची खातरजमा होताच शुक्रवारी पहाटेच ‘एनआयए’ आणि ‘एटीएस’च्या पथकांनी त्या घरावर छापेमारी करून अब्दुल नदीम अब्दुल समद सौदागर या तरुणाला ताब्यात घेतले. प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी चमडाबाजारमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नदीमला चौकशीसाठी छत्रपती संभाजीनगर येथे आणण्यात आले. रात्री उशिरापर्यंत त्याची चौकशी सुरू होती.

कोण आहे अब्दुल नदीम

‘एनआयए’ने ताब्यात घेतलेला अब्दुल नदीम सौदागर हा चमडाबाजार येथील रहिवासी असून त्याचा चामडे आणि भंगारचा व्यवसाय आहे. हैदराबाद येथे त्याचे सातत्याने जाणे-येणे आहे. नदीम हा जैश ए मोहमद या पाकिस्तानी अतिरेकी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;