घटस्फोटावरून मंत्र्यावर 100 कोटींचा खटला! वाचा सविस्तर

घटस्फोटावरून मंत्र्यावर 100 कोटींचा खटला! वाचा सविस्तर

साऊथ चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध जोडपं अभिनेत्री समंथा आणि नागा चैतन्य यांचा काही महिन्यांपूर्वीच घटस्फोट झाला. त्यांच्या घटस्फोटामुळे चाहते तर नाराज झालेच पण यामुळे तेलंगणातील वातावरण देखील तापलं आहे. या दोघांच्या घटस्फोटावर तेलंगणाच्या कॅबिनेट मंत्री कोंडा सुरेखा यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. आपल्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी नागा चैतन्यने मंत्री कोंडा सुरेखा यांच्यावर फौजदारी मानहानीचा शंभर कोटी रुपयांचा खटला दाखल केलाय.

अभिनेत्री समंथा रूथ प्रभू व तिचा पूर्वपती नागा चैतन्य या दोघांनीही या प्रकरणावर रोष व्यक्त केला होता. नागार्जुन यांनी सोशल मीडियावरही पोस्ट शेअर करत याबाबत प्रतिक्रिया दिली होती. यानंतर त्यांने तेलंगणाच्या काँग्रेस नेत्या कोंडा सुरेखा यांचा विरोधात मानहानीचा 100 कोटींचा खटला दाखल केला. त्यामुळे सध्या राजकारण तापलं आहे.

दरम्यान, समांथा आणि नागा चैतन्य  यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यानंतर कोंडा सुरेखा यांनी गुरुवारी त्यांचे वक्तव्य मागे घेतलाचे म्हटले होते. यानंतर सिने इंडस्ट्रीत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मात्र कोंडा सुरेखा यांनी मागितलेली माफी ही नागा चैतन्य  यांने नाकारली आहे. हे प्रकरण आता वैयक्तिक राहिले नसल्याचं नागा चैतन्य यांने स्पष्ट केले आहे.

अभिनेता नागा चैतन्यने टाइम्स नाऊला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने या प्रकरणावर भाष्य केलं. मंत्र्यांनी केलेली निंदा माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेली आहे. यापुढे आम्ही मनोरंजन व्यवसायात सॉफ्ट टारगेट राहणार नाही. स्वतःच्या राजकीय फायदांसाठी सेलिब्रिटींची नावे वापरू शकत नाहीत. मला आशा आहे की त्या महिलेविरुद्धची आमची कायदेशीर कारवाई इतर राजकारणांना आमच्या नावाचा अयोग्य वापर करण्यापासून सावध करेल असे तो यावेळी म्हणाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;