मुंबई-अहमदाबाद मार्गावर मुले चोरणारी टोळी जेरबंद, दोन चिमुकल्यांची सुटका

मुंबई-अहमदाबाद मार्गावर मुले चोरणारी टोळी जेरबंद, दोन चिमुकल्यांची सुटका

चिमुकल्यांचे अपहरण करून त्यांना गुजरात येथे नेत असतानाच मुलं चोरणाऱ्या टोळीवर पोलिसांनी झडप घातली. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चारोटी परिसरात पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोन चिमुकल्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. कासा पोलिसांनी कारवाई करत सहा चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

चारोटी परिसरात हाणामारी सुरू असल्याची माहिती कासा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाद मिटवला. मात्र यावेळी पोलिसांना सदर गाडीत दोन लहान मुले दिसली. पोलिसांनी या चिमुकल्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता सर्व प्रकार उघडकीस आला.

आपल्याला रेल्वे स्थानकावरून आरोपींनी उचलून आणल्याचे चिमुकल्यांनी पोलिसांना सांगितले. सत्यम मिश्रा (7) आणि सूरज मिश्रा (9) अशी अपहरण करण्यात आलेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. मुलांच्या माहितीनंतर पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली.

दरम्यान, चौकशीत मुलांच्या अपहरणाबाबत कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. कासा पोलिसांनी आरोपींना महात्मा फुले पोलिसांच्या स्वाधीन केले. तर दोन्ही लहान मुलांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;