सासूचा मृत्यू झाल्यावरही प्रसिद्ध अभिनेत्रीला हसावं लागलं, असं काय घडलं; अभिनेत्रीने थेट…

सासूचा मृत्यू झाल्यावरही प्रसिद्ध अभिनेत्रीला हसावं लागलं, असं काय घडलं; अभिनेत्रीने थेट…

कपिल शर्मा याचा शो गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करताना दिसतोय. विशेष म्हणजे अनेक मोठे कलाकार आपल्या आगामी चित्रपटांचे प्रमोशन करण्यासाठी या शोमध्ये येऊन मोठे खुलासे करताना दिसतात. अर्चना पूरण सिंह हिने चित्रपटांमध्ये मोठा धमाका केलाय. द कपिल शर्मा शोमधील अर्चना पूरण सिंह ही अत्यंत महत्वाचा भाग आहे. कायमच कपिल शर्माच्या शोमध्ये अर्चना ही हसताना दिसते. ‘कॉमेडी नाईट विथ कपिल’, ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये अर्चना पूरण सिंह ही दिसलीये. लोकांना वाटते की, अर्चना पूरण सिंह हिचे काम अत्यंत सोपे आहे आणि तिला फक्त शोमध्ये हसावेच लागते. 

आता नुकताच अर्चना पूरण सिंह हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये अत्यंत मोठे खुलासे करताना अर्चना पूरण सिंह ही दिसलीये. हेच नाही तर दु:खाचा डोंगर कोसळलेला असताना देखील अर्चना पूरण सिंह हिला हसावे लागल्याचा खुलासा अर्चना पूरण सिंहने केलाय. हैराण करणारा खुलासा अर्चना पूरण सिंहकडून करण्यात आलाय.

अर्चना पूरण सिंहने नुकताच एक मुलाखत दिलीये. अर्चना पूरण सिंहने म्हटले की, माझ्या सासूबाई रूग्णालयात दाखल होत्या आणि मी शूटिंगसाठी सेटवर होते. मला फोन आला आणि माझ्या सासूबाई गेल्या आहेत. मी माझ्या सासूच्या खूप जास्त जवळ होते. मला जसेही समजले की, त्यांचे निधन झाले तसे मी प्रोडक्शनला फोन करून सांगितले की मला जावे लागेल सासूचे निधन झाले.

मला प्रोड्यूसर्सने विनंती केली की, तुम्ही फक्त जाण्याच्या अगोदर काही हसण्याचे शॉट द्या. ते शॉट एपिसोडमध्ये लावण्यासाठी. मी त्यांना होकार दिला..मी हसत होते पण माझ्या मनात खूप काही गोष्टी सुरू होत्या. मी ज्या व्यक्तीच्या अत्यंत जवळ होते त्याचे निधन झाले आणि मी इकडे हसत होते. मी फक्त बाहेरून हसत होते मनात खूप गोष्टी सुरू होत्या.

मुळात म्हणजे यामध्ये प्रोडक्शनची एक टक्के देखील चूक नाहीये. प्रोड्यूसर्स खूप मोठा पैसा यामध्ये लावलेला असतो. अचानक गेल्याने खूप मोठे नुकसान होते, असेही अर्चना पूरण सिंहने म्हटले. आता अर्चना पूरण सिंह या मुलाखतीनंतर खूप जास्त चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय. अर्चना पूरण सिंह नेहमीच चर्चेत असणारे नाव आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;