Bigg Boss Marathi 5: ‘तुझं बाहेर लफडं असेल म्हणून…’, निक्की – अरबाज समोर, त्याच्या एका गोष्टीने वेधलं अनेकांचं लक्ष

Bigg Boss Marathi 5: ‘तुझं बाहेर लफडं असेल म्हणून…’, निक्की – अरबाज समोर, त्याच्या एका गोष्टीने वेधलं अनेकांचं लक्ष

Bigg Boss Marathi 5: ‘बिग बॉस मराठी 5’ शोचा विजेता घोषित होण्यासाठी आता फार कमी काळ राहिला आहे. लवकरच विजेत्याची घोषणा होणार आहे. त्याआधी घरातील ‘टॉप 6’ स्पर्धकांना मोठी आणि खास Surprise मिळणार आहे. ‘बिग बॉस’च्या घरात रियुनियन होणार आहे. रियुनियन म्हणजे ‘बिग बॉस मराठी 5’ शो सुरु झाल्यापासून ज्या स्पर्धकांना घरात प्रवेश केला होते ते पुन्हा शेवटच्या दिवशी घरात येणार आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील रियुनियनचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सध्या सर्वत्र  ‘बिग बॉस’च्या घरातील रियुनियनची चर्चा रंगली आहे. पण अरबाज आणि निक्की यांच्या भेटीची उत्सुकता सर्वांना लागली होती. अखेर शेवटच्या दिवशी बिग बॉसच्या घरात दोघांची भेट झाली आहे. अनेक दिवसांनंतर निक्कीला पाहिल्यानंतर अरबाज पळत निक्कीच्या दिशेने गेला. दोघांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावेळी अरबाज याने निक्कीला अनेक गोष्टांबाबत स्पष्टीकरण दिलं.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

 

निक्की म्हणाली, ‘तू जाताना रडला नाही, त्यामुळे मला वाटलं खरंत तुझं बाहेर लफडं असेल… त्यामुळे तुला फरक पडला नाही..’ निक्कीच्या या वक्तव्यानंतर अरबाज याय उत्तर देणार हे पाहणं म्हत्त्वाचं ठरणार आहे. आता अरबाज, निक्कीला काय सांगतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. एवढंच नाही तर, अरबाज याच्या कोटवर असलेल्या ‘बाई…’ या बॅचने देखील चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

सांगायचं झालं तर, अरबाज आठव्या आठवड्याच एलिमिनेट झाल्यावर निक्की ढसाढसा रडली होती. दोघांचे अनेक भावूक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. अरबाज याने शोचा निरोप घेतल्यानंतर निक्कीचे आई-वडील तिला भेटण्यासाठी आले होते. तेव्हा अरबाज याचा साखरपुडा झाल्याचं समजलं आहे… असं निक्कीच्या आईने तिला सांगितलं.

यावर अरबाज याने स्पष्टीकरण देखील दिलं होत. माझा साखरपुडा झालेला नाही. शो संपल्यानंतर निक्की बाहेर येईल तेव्हा तिला सर्व काही सांगेल… असं अरबाज म्हणाला होता. अखेर घडलेल्या अनेक गोष्टींनंतर निक्की – अरबाज अखेर आमने – सामने आले आहेत. आता पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;