पंतप्रधान मोदींच्या सभेत लाडक्या बहिणींची फरफट, भर उन्हात अनवाणी गाठावे लागले सभामंडप
महिला सक्षमीकरण आणि लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ठाण्यात सभा घेणार आहेत. पण ज्या लाडक्या बहिणींसाठी हा कार्यक्रम होत आहे त्याच लाडक्या बहिणींचे हाल होत आहेत. भर उन्हात लाडक्या बहिणी पंतप्रधान मोदींच्या सभामंडपाच्या ठिकाणी पोहोचत आहेत.
नवरात्र सुरू असल्याने अनेक माता भगिनींचे उपवास सुरू आहेत. अनेक मता भगिनी या काळात पायात चप्पल घालत नाहीत. त्यामुळे भर उन्हात या माता भगिनी अनवाणीच कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचल्या आहेत. या महिलांनी तब्बल दीड किलोमीटर पायपीट केली आहे. त्यामुळे अनेक महिलांनी संताप व्यक्त केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List