सुजय विखे पाटलांच्या पत्नीच्या प्रश्नावर श्रद्धा कपूरचं मार्मिक उत्तर, जोडीदाराबद्दल दोघींचं मोठं वक्तव्य

सुजय विखे पाटलांच्या पत्नीच्या प्रश्नावर श्रद्धा कपूरचं मार्मिक उत्तर, जोडीदाराबद्दल दोघींचं मोठं वक्तव्य

Shraddha Kapoor: अभिनेत्री श्रद्धा कपूर फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीने जोडीदाराबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात श्रद्धाने जोडीदाराबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे श्रद्धा पुन्हा चर्चेत आली आहे. शिर्डी येथे नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात श्रद्धा हिने कसा जोडीदार हवा? यावर मोठं वक्तव्य केलं आहे.

माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या जनसेवा फाऊंडेशनच्या वतीने नारी शक्ती सन्मान सोहळयाच आयोजन करण्यात आल होत. कार्यक्रमात श्रद्धा देखील उपस्थित होती. कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दहा महिलांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

कार्यक्रमात सुजय विखे पाटील यांच्या पत्नी धनश्री सुजय विखे पाटील यांनी श्रद्धा कपूर हिला जोडीदाराबद्दल प्रश्न विचारला. यावर अभिनेत्रीने मार्मिक उत्तर दिलं. धनश्री सुजय विखे पाटील यांनी श्रद्धाला विचारलं, ‘मला माझा हिरो मिळाला पण तुला कसा हिरो आवडेल ? ‘

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Dr Sujay Vikhe Patil (@drsujayvikhe)

 

यावर श्रद्धा म्हणाली, ‘माझे वडीलच माझे सुपरहिरो आहेत…’ श्रद्धाने दिलेल्या उत्तरानंतर उपस्थित महिलांनी टाळ्या वाजवून दाद दिली…या सोहळ्यात श्रद्धाने मराठीत संवाद साधला आणि गाणं देखील गायल. श्रद्धा कायम पापाराझींसोबत देखील मराठीतून संवाद साधत असते. अभिनेत्री मराठमोळा अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडतो.

श्रद्धा कपूर हिचे कायम फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेक व्हिडीओंमध्ये अभिनेत्री मराठी बोलताना दिसते. श्रद्धाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी श्रद्धा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.

सोशल मीडियावर श्रद्धा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. सोशल मीडियावर श्रद्धाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर चाहते देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. शिवाय चाहते श्रद्धाच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत देखील कायम असतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;