सूरज चव्हाणचा झापूक-झुपूक अंदाजात होणाऱ्या बायकोसाठी उखाणा, व्हिडीओ तुफान व्हायरल

सूरज चव्हाणचा झापूक-झुपूक अंदाजात होणाऱ्या बायकोसाठी उखाणा, व्हिडीओ तुफान व्हायरल

Bigg Boss Marathi 5: ‘बिग बॉस मराठी’ पाचव्या पर्वाचा लवकरच शेवट होणार आहे. त्यामुळे सर्वत्र फक्त आणि फक्त बिग बॉसची चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर देखील स्पर्धकांचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. त्यामुळे ‘बिग बॉस मराठी’ शोचा पाचवा पर्वा कोणाच्या नावावर होणार… याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विजेत्यांच्या यादीमध्ये सूरज चव्हाण याचं नाव देखील चर्चेत आहे. दरम्यान, सूरजचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सूरज याने त्याच्या होणाऱ्या पत्नीसाठी उखाणा घेतला आहे.

सांगायचं झालं तर, अभिनेता रितेश देखमुख यांच्या अनुपस्थितीत अभिनेते डॉ. निलेश साबळे यांनी शोच्या होस्टची जबाबदारी पार पाडली. तेव्हा साबळे यांनी सूरज याला उखाणा घेण्यासाठी सांगितलं. निलेश साबळे म्हणाले, ‘बाहेर निक्की सारख्या सुंदर दिसणाऱ्या मुली देखील तुझ्यासाठी साडी नेसायला तयार झाल्या आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी झापूक झुपूक स्टाईलमध्ये उखाणा झाला पाहिजे..’

 

 

निलेश साबळे यांनी केलेल्या विनंतीनंतर सूरज याने स्वतःच्या हटके स्टाईलमध्ये होणाऱ्या बायकोसाठी उखाणा घेतला. ‘हौसेनं केली मी ती बायको… ती निघाली सायको… पण काय करणार तिच माझी बायको… झापूक झुपूक…’, सध्या सूरज याने घेतलेला उखाणा सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. व्हिडीओवर चाहत्यांनी देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

‘बिग बॉस’ संपल्यानंतर सूरजचं मोठं सिक्रेट

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

 

‘बिग बॉस’ मधून बाहेर आल्यानंतर सूजर स्वतःचं घर बांधणार आहे. सूरज म्हणाला, ‘बिग बॉसने मला फार मोठी संधी दिली आहे. या संधीचं मी नक्कीच सोनं करेल… मी बिग बॉसला कधीत विसरणार नाही. शो संपल्यानंतर बाहेर जाऊन मी माझं घर बांधणार आहे. माझ्या घराला मी ‘बिग बॉस’ असं नाव देणार आहे…. झापुक झुपूक बिग बॉस गुलीगत…बुक्कीत टेंगूळ आणि मी ही ट्रॉफी नक्की जिंकणार.’ असं देखील सूरज यावेळी म्हणाला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;