शिवसेना हजारो बेरोजगारांना नोकरी देणार; विलेपार्ल्यात आज ‘महा नोकरी’ मेळावा, उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

शिवसेना हजारो बेरोजगारांना नोकरी देणार; विलेपार्ल्यात आज ‘महा नोकरी’ मेळावा, उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि राज्यातील मिंधे सरकारच्या काळात बेरोजगारी सातत्याने वाढत आहे. सरकार रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात अपयशी ठरले आहे. अशा परिस्थितीतही शिवसेना उद्या हजारो बेरोजगारांना हक्काची नोकरी देणार आहे. त्यासाठी विलेपार्ले येथे ‘महा नोकरी’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांचीही या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार, शिवसेना नेते अ‍ॅड. अनिल परब यांनी निवडणूक जाहिरनाम्यात दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी हा महा नोकरी मेळावा शिवसेनेच्या माध्यमातून आयोजित केला आहे. विलेपार्ले पूर्व, सहारा हॉटेलजवळ, बालाजी रेस्टॉरंटच्या एटीसी टॉवरसमोर, 1 बी एमएलसीपी पार्किंग तळमजला येथे हा मेळावा उद्या सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत होणार आहे.

13 हजार युवकांनी या मेळाव्यासाठी नोंदणी केली आहे. तसेच सुमारे 16 हजार युवक मेळाव्यात सहभाग घेतील, असा अंदाज आहे. सुमारे 14 हजार युवकांना या मेळाव्यात रोजगार मिळेल. मेळाव्यासाठी नोंदणी केलेल्या युवकांनी येताना बायोडेटा, केवायसी कागदपत्रे आणि छायाचित्र सोबत आणावे, असे आवाहन आमदार अनिल परब यांनी केले आहे.

लॉजिस्टीक, बँकिंग, इन्शुरन्स, बीपीओ, हॉस्पिटॅलिटी, फायनान्स, शिक्षण, बांधकाम, माहिती तंत्रज्ञान, उद्योग क्षेत्रातील 130 कंपन्या या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. त्यात अॅमेझॉन, हिंदुजा, एचडीएफसी, एसबीआय, बजाज, टाटा एआयजी, एअरटेल, आयसीसी लोम्बार्ड अशा नामांकित कंपन्यांचा समावेश आहे.

स्थळ ः 1 बी एमएलसीपी पार्किंग टी 1 तळमजला, पार्ले (पू.)

वेळ ः सकाळी 9 ते सायं. 6 पर्यंत

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;