प्रियांका चोप्रा हिचा ‘तो’ अत्यंत मोठा खुलासा, म्हणाली, मी आयुष्यात..

प्रियांका चोप्रा हिचा ‘तो’ अत्यंत मोठा खुलासा, म्हणाली, मी आयुष्यात..

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. प्रियांका चोप्राची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. निक जोनस याच्यासोबतच्या लग्नानंतर प्रियांका चोप्रा ही विदेशात शिफ्ट झालीये. प्रियांका कधीतरी भारतात येताना दिसते. विदेशात राहत असली तरीही प्रियांका चोप्रा ही आपल्या चाहत्यांच्या संपर्कात सोशल मीडियाच्या माध्यमातून कायमच असते. चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचा किस करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला. थेट कॅमेऱ्यासमोरच निक आणि प्रियांका हे किस करताना दिसले.

प्रियांका चोप्रा हिच्याकडून मोठा खुलासा करण्यात आला. नाकावर शस्त्रक्रिया करणे प्रियांकाला चांगलेच महागात पडले होते. प्रियांका चोप्रा म्हणाली की, माझ्या नाकातील पॉलीप काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, त्या शस्त्रक्रियेनंतर माझ्या नाकाचा पूर्ण आकार बदलून गेला होता. तो काळ माझ्यासाठी इतका जास्त वाईट आणि वेगळा होता की, मी डिप्रेशनमध्येच गेले. 

प्रियांका म्हणाली की, माझा पूर्ण चेहराच वेगळा दिसत होता. या शस्त्रक्रियेचा माझ्या मानसिक आरोग्यावर आणि करिअरवरही वाईट परिणाम झाला. त्यावेळी प्रियांकाच्या हातून तब्बल तीन मोठे चित्रपट देखील गेले होते. वडिलांनी या वाईट काळात आपल्याला खूप जास्त सपोर्ट केल्याचे सांगताना देखील प्रियांका चोप्रा ही दिसली. 

प्रियांका म्हणाली, माझ्या वडिलांनी त्यावेळी मला वचन दिले होते की, काहीही झाले तरीही मी तुझ्यासोबत पूर्णपणे आहे. माझ्या वडिलांमुळेच मला आत्मविश्वास परत मिळाला. मी डिप्रेशनमध्ये असल्याने ते माझ्यासोबतच असायचे. त्यानंतर परत नाकावर प्रियांकाने शस्त्रक्रिया करून घेतली. प्रियांका चोप्रा ही अशी अभिनेत्री आहे जिने मान्य केले की, तिने नाकाची शस्त्रक्रिया केलीये.

प्रियांका चोप्रा ही चक्क एका मुलाखतीमध्ये बॉलिवूडबद्दल मोठे खुलासे करताना दिसली. बॉलिवूडमधून आपल्याला कसे एका कोपऱ्यात ढकलले जात होते हे सांगताना अभिनेत्री दिसली. मला चित्रपटांमध्ये काम मिळू नये, यासाठी काही लोक प्रयत्न करत होते, असा दावाही प्रियांका चोप्रा हिच्याकडून थेट करण्यात आलाय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;