भाजपला दे धक्का! हर्षवर्धन पाटलांची मोठी घोषणा, शरद पवारांच्या पक्षात करणार प्रवेश

भाजपला दे धक्का! हर्षवर्धन पाटलांची मोठी घोषणा, शरद पवारांच्या पक्षात करणार प्रवेश

पुणे जिल्ह्यातील इंदापूरमधील मातब्बर नेते हर्षवर्धन पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला त्यांनी जोरदार झटका दिला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी आज इंदापूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत आपला हा निर्णय जाहीर केला. शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करावा, असा आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह होता. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले.

हर्षवर्धन पाटील हे शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू होती. हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी कार्यकर्त्यांशीही संवाद साधला. कार्यकर्त्यांनीही रामकृष्ण हरी वाजवा तुतारी, अशी मागणी केली. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेत हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला.

हा निर्णय घेण्यापूर्वी भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतल्याचे पाटील यांनी सांगितले. इंदापूरची जागा ही विद्यमान सदस्याला जाणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले. दुसरा पर्याय काढू, असे फडणवीस म्हणाले. पण दुसरा पर्याय स्वीकारणे कार्यकर्त्यांना मान्य झाले नसते. व्यक्तिगत तो निर्णय योग्य ठरला असता, पण जनतेचा प्रश्न असतो, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;