पुणे हादरले… बोपदेव घाट परिसरात तरुणीवर सामूहिक बलात्कार

पुणे हादरले… बोपदेव घाट परिसरात तरुणीवर सामूहिक बलात्कार

कोंढव्यातील बोपदेव घाट परिसरात 21 वर्षीय तरुणीवर तिघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. कालच वानवडी भागात सहा वर्षाच्या दोन मुलींवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर आता सामूहिक बलात्काराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काल रात्री बोपदेव घाट परिसरात 21 वर्षीय तरुणी मैत्रिणीसोबत गेली होती. त्याठिकाणी रात्री अकराच्या सुमारास तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास पोलिसांना ही माहिती मिळाली. त्यांनतर गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांची पथके आरोपींच्या मागावर रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सातत्याने घडणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अत्याचार, विनयभंगाच्या घटना कमी होत नसल्याने महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना तयार झाली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;