मोठी बातमी: संजय राठोड यांच्या गाडीला भीषण अपघात, धडकेत पिकअप चालक गंभीर जखमी

मोठी बातमी: संजय राठोड यांच्या गाडीला भीषण अपघात, धडकेत पिकअप चालक गंभीर जखमी

महायुती सरकारमधील मंत्री तसेच यमतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा भीषण झाला आहे. अपघातानंतर गाडीतील एअरबॅग्ज खुल्या झाल्यामुळे संजय राठोड बचावल्याचे कळत आहे. आतापर्यंतच्या माहितीनुसार यवतमाळच्या आर्णी जवळील कोपरा येथे संजय राठोड यांच्या वाहनाने बुलोरो पिकअप वाहनाला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या धडकेत बुलोरो पिकअप वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला आहे.

पोहरागड वरून यवतमाळकडे पालकमंत्री संजय राठोड जात असताना दिग्रस ते आर्णी मार्गावर असलेल्या कोपरा गावाजवळ पालकमंत्र्यांच्या वाहनाने समोरच्या वाहनाला धडक दिल्याने मालवाहतूक बोलोरो पिकप पलटी झाली आणि त्यातील चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पालकमंत्र्यांच्या वाहनाचा समोरचा भाग संपूर्ण झाला चकणाचूर झाला आहे.

अपघात सुमारे दोन वाजून दहा मिनिटांनी झाल्याची मिळत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहरा देवीच्या दर्शनाला 5 तारखेला येणार आहेत. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी संजय राठोड हे पोहरादेवी येथे गेले होते. ते रात्रीपोहरादेवी येथून निघाले आणि यवतमाळकडे जात होते. मात्र याप्रवासादरम्यान आर्णी येथील कोपरा गावाजवळ संजय राठोड यांच्या वाहनाने समोरच्या पिकअपला धडक दिली आणि अपघात झाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;