कोणी पैसे देत का पैसे! पाकिस्तानी खेळाडूंचे बेकार हाल, चार महिन्यांपासून पगारच मिळाला नाही

कोणी पैसे देत का पैसे! पाकिस्तानी खेळाडूंचे बेकार हाल, चार महिन्यांपासून पगारच मिळाला नाही

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) गेल्या काही महिन्यांपासून विविध कारणांमुळे चर्चेत आहे. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पीसीबी बक्कळ पैसा स्टेडियम बनवण्यासाठी खर्च करत आहेत. मात्र दुसरिकडे पाकिस्तानी खेळाडूंना (पुरुष आणि महिला) मागिल चार महिन्यांपासून पगार मिळाला नसल्याची माहिती समोर आली आहे.

पाकिस्तानातील वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी खेळाडूंना मागील चार महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. त्यामुळे आता खेळाडूंच्या अडचणी वाढल्या आहेत. मात्र दुसरिकडे 2025 मध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या ICC Champions Trophy च्या आयोजनासाठी पीसीबी स्टेडियम तयार करण्यावर बक्कळ पैसा खर्च करत आहे.  क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार, महिला टी-20 विश्वचषकामध्ये पाकिस्तानी महिलांचा संघ सहभागी झाला आहे. मात्र त्यांना सुद्धा मागील चार महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. महिला खेळाडूंचा करार ऑगस्ट 2023 पासून जून 2025 पर्यंत आहे. मात्र जून 2024 पासून आतापर्यंत त्यांना पगार मिळालेला नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;