अंकिता लोखंडे प्रेग्नेंट? ‘लाफ्टर शेफ’च्या सेटवरील व्हिडीओ होतोय व्हायरल

अंकिता लोखंडे प्रेग्नेंट? ‘लाफ्टर शेफ’च्या सेटवरील व्हिडीओ होतोय व्हायरल

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या ‘लाफ्टर शेफ’ शोमध्ये दिसत आहे. या शोच्या सेटवरील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यावरुन अंकिता काहीतरी गूड न्यूज देणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

‘लाफ्टर शेफ’ हा कॉमेडीन शो आहे. शोच्या नवीन प्रोमोमध्ये अंकिता लोखंडे पोट दुखत असल्याची तक्रार करत आहे. मात्र यावेळी इतरांनी ही प्रेग्नेंसीची लक्षणे असल्याचे म्हणत तिची मजा घेताना दिसत आहेत. ‘लाफ्टर शेफ’च्या नवीन प्रोमोनुसार, या शोमध्ये मुनावर फारुकी पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे. प्रोमोच्या सुरुवातीला विकी जैन अंकिता लोखंडेला विचारतो की, तू ठीक आहेस का? यावर उत्तर देताना, ती पोटात दुखत असल्याची तक्रार करते. तिचं पोट दुखत असल्याचं पाहून सर्वजण तिच्याभोवती गोळा होतात. मुनव्वर फारुकी म्हणतो, ‘तिला चक्कर आली आणि ती पडली. चांगली बातमी आहे का?’ दरम्यान, अली गोनीनं तिने पाय जड झाल्याची म्हणजेच ती प्रेग्नेंट असल्याचे गमतीने बोलताना दिसत आहे. यावेळी अर्जुन बिजलानी, भारती सिंह, रीम शेख आणि इतर कलाकार तिच्याभोवती नाचू लागतात. त्यानंतर विकीने अंकिताच्या कपाळावर किस केले.

विकी आणि अंकिताकडून याबाबत काही अधिकृत माहिती आलेली नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;