अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचा जलदगतीने तपास करा; हायकोर्टाचे आदेश

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचा जलदगतीने तपास करा; हायकोर्टाचे आदेश

मुंबई उच्च न्यायालयात आज पुन्हा अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने तपास गांभीर्याने आणि जलदगतीने करण्याचे आदेश दिले. अक्षय शिंदेचा पोलीस कोठडीत असताना मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशी सुरू करण्यात आली आहे. ही चौकशी जलदगतीने करून १८ नोव्हेंबरपर्यंत चौकशी अहवाल सादर करा, असे आदेश न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने मॅजिस्ट्रेटना दिले.

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांच्यावतीने अ‍ॅड. अमित कटारनवरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने सुनावणी घेतली. या सुनावणीवेळी खंडपीठाने सर्व पुरावे फॉरेन्सिक तज्ञांमार्फत सुरक्षितरित्या जतन करून ठेवण्याचे आदेशही दिले. खंडपीठाने मागील सुनावणीवेळी एन्काऊंटरवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

पोलिसांनी केलेल्या कथित एन्काऊंटरच्या चौकशीसाठी राज्य सरकारने चौकशी आयोग नेमला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश (निवृत्त) दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय चौकशी आयोग नेमण्यात आला आहे. या आयोगाची माहिती आज न्यायालयाला देण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;